🌟राजकारणाला आदर्श धम्मकारणाची जोड देणार सुसंस्कृत व्यक्तिमत्व उत्तम भैया खंदारे....!🌟पुर्णा नगरपालिकेचे नगरसेवक उपनगराध्यक्ष नगरपालिकेचे गटनेते अशी त्यांच्या राजकीय जीवनाची चढती कमान राहिली🌟

✍🏻व्यक्ती आणि व्यक्तीमत्व - श्रीकांत हिवाळे

पूर्णा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष नगरपालिकेचे गटनेते तथागत मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम भैया खंदारे पूर्णा शहराच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये धम्मकारण आणि आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांचं समर्पित योगदान सर्वश्रुत आहे.

आंबेडकरी व धम्म चळवळीचा समृद्ध वारसा लाभलेल्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला.भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य एम यु खंदारे साहेब हे त्यांचे वडील पूर्णा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका पॅंथर चळवळीतील अग्रणी गया ताई खंदारे या त्यांच्या मातोश्री यांच्या संस्काराखाली त्यांच्या विचारांची जडणघडण झाली अगदी बालपणापासून उत्तम भैया यांचे ध्येय होतं भारतीय सैन्यामध्ये जाऊन देश सेवा करावी व मातृभूमीच्या ऋणातून मुक्त व्हावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून ते सैन्यामध्ये भरती झाले.

परंतु कौटुंबिक अडचणीमुळे अगदी काही वर्षांमध्ये नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णा या ठिकाणी परतले अखिल भारतीय भिकू संघाचे महाराष्ट्राचे महासचिव पूज्य भदंत डॉक्टर उपगुप्त महस्थविर यांच्या कुशल धम्म मार्गदर्शनाखाली तथागत मित्र मंडळाचे कार्य लेझीम पथकाच्या माध्यमातून पूर्णा तालुक्यामध्ये व संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये पोहोचवण्याचं काम केलं तरुणाईला स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीचे धडे दिले सुप्रसिद्ध आंबेडकर विचारवंत रिपाईचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रकाश कांबळे हे त्यांचे राजकारणातील आदर्श व्यक्तिमत्व त्यांच्या वैचारिक तालीम मध्ये त्यांची जडणघडण झाली.

पूर्णा नगरपालिकेचे नगरसेवक उपनगराध्यक्ष नगरपालिकेचे गटनेते अशी त्यांच्या राजकीय जीवनाची चढती कमान राहिली.पूर्णा शहरांमध्ये व संपूर्ण तालुक्यामध्ये सामाजिक सद्भभाव एकोपा रहावा म्हणून त्यांचे नेहमीच प्रयत्न असतात.समाजामधील शोषित पीडित वंचित अन्यायग्रस्त यांच्या मदतीसाठी ते सदैव तत्पर असतात.धम्मा मधील दान परमिता मंगल मैत्री हा त्यांच्या स्वभावामधील स्थायीभाव आहे.हिंगोली जिल्ह्यातील वाई ही त्यांची जन्मभूमी या ठिकाणी सम्राट अशोक कालीन सांची स्तूपाची प्रवेश कमानीची ची प्रतिकृती स्वखर्चातून निर्माण केली.

या अनावरण समारंभाला बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आदरणीय आनंदराज जी आंबेडकर यांच्या हस्ते हा अनावरण सोहळा पार पडला.त्यांची कर्मभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर पूर्णा या ठिकाणी अशाच प्रकारची कमान त्यांनी स्वखर्चातून उभी करून भदंत डॉक्टर उपगुप्त महस्थविर व पूजनियभिकू संघाचे हस्ते हा अनावरण सोहळा पार पडला.डॉक्टर आंबेडकर नगर पूर्णा या ठिकाणी बौद्धकालीन वास्तु शिल्पकलेचा विलोभनीय नमुना असलेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह ची निर्मितीआपल्या सहकारी सन्माननीय नगरसेवकांना सोबत घेऊन केले.

जवळपास दोन दशकापासून पूर्णा शहराच्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आंबेडकरी व धम्म चळवळीमध्ये त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.दरवर्षी त्यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी उपक्रमांनी साजरा होत असतो.वृक्षारोपण नेत्र तपासणी शिबिर आरोग्य तपासणी शिबिर पूजनीय भिकू संघाना चिवरदन भोजनदान अशा प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन तथागत मित्र मंडळाच्या माध्यमातून होत असते त्यांच्या या सर्व उपक्रमांमध्ये त्यांच्या सुविद्य सहचारिनी विशाखा ताई यांचा मुलाचा वाटा असतो.

दिनांक 16 सप्टेंबर हा त्यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी संकल्प दिन म्हणून तथागत मित्र मंडळाच्या वतीने साजरा होत आहे या मंगल प्रसंगी माननीय उत्तम भैया मुगाजी खंदारे यांना आयो आरोग्य बल व वैभव प्राप्त हो वो ही मनोकामना.पौर्णिमेच्या शितल अल्हाददायक चंद्रमाप्रमाणे त्यांचं व कुटुंबाचे आयुष्य प्रकाशमान होवो ही सदिच्छा...!

शुभेच्छुक श्रीकांत हिवाळे सर अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णा जिल्हा परभणी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या