🌟संगीत वाद्य शाखेचे मारुती बाबा कुर्‍हेकर यांच्या हस्ते उद्घाटन.....!


🌟आळंदी येथे चाकण चौकात गंगाजी बापू देवाची आळंदी येथे शाखा स्थापन🌟 


पुणे/ खेड - आळंदी येथील चाकण चौकात मारोती आवरगंड यांचे शाखा १ वडगाव चौक व शाखा २ चाकण चौक ज्ञानेश्वर विद्यालयाच्या समोर आज सोमवार दि.१८ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळच्या दरम्यान शांती ब्रह्म ह.भ.प. मारुती बाबा कुर्हेकर जोग महाराज संस्था अध्यक्ष देवाची आळंदी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संगीत वाद्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले .


 पखवाज, तबला, पेटी, हार्मोनियम ,ढोलकी, टाळ ,वीणा, योग्य दरात दुरुस्ती करण्याचे भव्य दालन उभारण्यात आले आहे.तसेच मुंजाजी आवरगंड, गंगाधर आवरगंड ,यांची शाई, बनारसपुडी ,वादी ,गजरा ,कलर पाॅलीस, तबला आधी दुरुस्तीचे साहित्य सह विक्रीचेही साहित्य ठेवण्यात आली आहे .

सदरील शाखा १वडगाव चौक, चाकण चौक येथील येणाऱ्या ग्राहकाने योग्य दरात विक्री व दुरुस्ती करून घेण्यास सहकार्य करावे अशी विनंती आवरगंड परिवाराकडून महाराष्ट्रातील स्वस्त दरात चांगल्या उत्कृष्ट विक्री व दुरुस्ती करण्यासाठी ग्राहकास आवाहन केले आहे .

यावेळी ह.भ.प. सिताराम बाबा, सुरेश भोसले, कृष्णा रोकडे ,ज्ञानेश्वर शिरसाट, माधव शिरसाठ ,शिवाजी शिराळे, गोविंद मोरे ,सचिन सोनकांबळे माऊली मोरे, मुंजाजी काळबांडे, साहेबराव जोगदंड गोविंद नवघरे धीची उपस्थिती होती .

या कार्यक्रम मारोती आवरगंड, जनार्धन आवरगंड ,सुशीला,आवरगंड सोनाली ,आवरगंड ,वैष्णवी आवरगंड गंगाधर आवरगंड,मुंजाजी, आवरगंड आदींनी पुढाकार घेतला,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या