🌟पुर्णा तालुक्यातील मौ.धनगर टाकळी येथे गणपती उत्सवानिमित्त सामान्य ज्ञान परीक्षा संपन्न....!


🌟या परीक्षेत गावातील एकूण २४० विद्यार्थ्यांनी सहभाग🌟


पुर्णा (दि.२६ सप्टेंबर २०२३) - पुर्णा तालुक्यातील मौ.धनगर टाकळी गावात मागच्या सात वर्षांपासून सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात येते दरवर्षी प्रमाणे याही वर्षी धनगर टाकळी गावात गणपती उत्सवानिमित्त सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत एकूण दोन गट करण्यात आले होते. एक गट पाचवी ते सातवी, दुसरा गट आठवी ते दहावी. या परीक्षेत गावातील एकूण २४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 


या परीक्षेला खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी वर्गाचा सहभाग दिसला.परीक्षा संपन्न झाल्या नंतर लगेचच पेपर तपासून निकाल लावण्यात आला. प्रत्येक गटातून तीन नंबर काढण्यात आले. पहिला, दुसरा व तिसरा. या परीक्षेत नंबर आलेला मुलांना काही रक्कम आणि ट्रॉफी देण्यात आली.हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी सर्व गणेश मंडळाचे कार्यकर्ते, तरुण वर्ग, शिक्षक वर्ग व गावकरी मंडळी यांनी प्रयत्न केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या