🌟सावधान : डिजे नामक राक्षसी वाद्यांच्या दणक्यामुळे दोघांना गमवावे लागले आपले प्राण...!


🌟 राज्यातील सांगली जिल्ह्यातील दुर्दैवी घटना🌟 

सांगली : संपूर्ण राज्यात डिजेला बंदी असताना देखील सार्वजनिक महोत्सवांमध्ये डिजेचा वापर होत असल्याने त्याचे दुष्परिणामही समोर येऊ लागले असून राज्यात सर्वत्र मोठ्या थाटामाटात गणेशोत्सव साजरा करण्यात येत असताना मात्र सांगलीतून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. गणेश विसर्जना दरम्यान डीजेच्या दणदणटामुळे दोन तरुणांना आपले प्राण गमवावे लागल्याचे समोर आले आहे. या दोन स्वतंत्र घटना असून दोन्ही घटना सांगली जिल्ह्यात घड़ल्या आहेत.

यात तासगाव तालुक्यातील शेखर पावशे आणि वाळवा तालुक्यातील प्रविण शिरतोड़े अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. या घटनेमुळे संपुर्ण जिल्ह्मासह राज्यात खळबळ माजली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हे दोघेही विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गेले होते दरम्यान डीजेच्या दणदणटामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले.

यातील शेखर एंजिओप्लास्टी झाली होती. तर प्रविण शिरतोडे मिरवणूरकीतच चक्कर येऊन पड़ला. दरम्यान, या घटनेमूळे डीजे तयार करणा्या कंपन्यांवर कारवाई करावी. तसेच मृत्यू झलेल्या युवकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.

* डिजेचा दणदणाटमुळे मृत्यू होतो का ?

ज्या लोकांना पूर्वीपासूनच हृदयाचा आजार आहे अशा लोकांचे ध्वनी प्रदुृषणामुळे बलड प्रेशर वाढून हार्ट अटेॅक येऊ शकतो. त्यामुळे अशा लोकांनी जोरात आवाज असलेल्या ठिकाणांपासून दूर राहावे, असे तज्ञांकडून सांगण्यात येते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या