🌟मुंबईतील समृद्धी महामार्ग भूसंपादन बैठकीत आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी शेतकरी हिताची भूमिका प्रखरपणे मांडली...!


🌟शेतकऱ्यांना दहा पट मावेजा मिळाला पाहिजे अशी आग्रही मागणी आ.गुट्टे यांनी मंत्री दादा भुसे यांच्याकडे केली🌟


गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय व कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी आज मुंबई येथे झालेल्या समृद्धी महामार्ग भूसंपादन विषयी बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहून शेतकऱ्यांची मागणी आणि वस्तुस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून दिली. 


समृद्धी महामार्ग निर्मितीसाठी भूसंपादन होताना मावेजा संदर्भात काही समस्या व अडचणी शेतकरी वर्गांने मांडल्या होत्या. तसेच भूसंपादन पूर्वी झालेले पंचनामे चुकीचे होते असेही शेतकरी वारंवार सांगत होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह नांदेड, जालना, परभणी जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, संबंधित अधिकारी यांची बांद्रा मुंबई येथील कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकीत कर्तव्यदक्ष आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी शेतकरी हिताची भूमिका मांडली. 

उत्तम दर्जाच्या दळणवळणासाठी समृद्धी महामार्ग सारखे रस्ते आवश्यक आहेत. मात्र, विकास होताना सर्वांना सोबत घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना दहा पट मावेजा मिळाला पाहिजे, अशी आग्रही भूमिका शेतीप्रेमी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी मंत्री महोदय यांच्या समोर मांडली. तसेच विभागांशी संबंधित इतरही विषयांवर सविस्तर चर्चा केली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या