🌟औरंगाबाद जिल्ह्यात येलो अलर्ट जारी : नागरिक,शेतकरी यांनी खबरदारी घ्यावी....!


🌟विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता🌟

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला असून आज शनिवार दि.०९ सप्टेंबर रोजी प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा, मुंबई यांनी सदर कालावधीत ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची,विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

त्यानुषंगाने नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व यंत्रणा व नागरिक, शेतकरी यांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापण कक्ष औरंगाबाद यांनी कळविले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या