🌟परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे मा.मंत्री भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या ‘शिवशक्ती परिक्रमा यात्रेचें जंगी स्वागत...!


🌟यावेळी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांचे स्वागत स्विकारून  यात्रा पुढे गंगाखेड शहरालगत असलेल्या श्री.मन्नाथ मंदिराच्या दिशेने गेली🌟


परभणी/गंगाखेड (दि.१० सप्टेंबर २०२३) - भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या तथा माजी मंत्री पंकजाताई गोपिनाथ मुंडे यांच्या ‘शिवशक्ती परिक्रमा यात्रेचें परळी-गंगाखेड मार्गावर हॉटेल गोकूळ येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी आज रविवार दि.१० सप्टेंबर २०२३ रोजी जंगी स्वागत केले. 


जेसीबी मधून होणारी फुलांची उधळण, "पंकजाताई तुम आगे बढो' "कोण आली रे कोण आली महाराष्ट्राची वाघीण आली' "गोपीनाथ मुंडे साहेबांचा विजय असो' अशा विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. दरम्यान आ. गुट्टे यांनी  या यात्रेचे ,मुंडे यांचे कौतुक केले.भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस मुंडे यांची ‘शिवशक्ती परिक्रमा यात्रा' गेली काही दिवस यशस्वीपणे सुरू आहे. दरम्यान अनेक आध्यात्मिक व धार्मिक स्थळांसह विविध ठिकाणांना त्या भेटी देत आहेत. लोकांशी संवाद साधत आहेत.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आजही निष्ठेने सोबत असणारा एक वर्ग आहे. श्रध्देय स्व.गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या विचाराने प्रभावित झालेली मंडळी आजही ताईंच्या सोबत आहेत. काळ आणि वेळ सगळ्यांवर येत असते. मात्र, निखाऱ्यातून आपली पाऊलवाट शोधणाऱ्या ताई साहेबांच्या वारसदार आहेत. म्हणून त्या जिद्दी, मेहनती, निर्धारू आणि संघर्षकन्या आहेत. त्यांचं हेच वेगळेपण आजच्या राजकारणात विरळ ठरत आहे, असे ते म्हणाले.

आ.गुट्टे यांचे स्वागत स्विकारून  यात्रा पुढे गंगाखेड शहरालगत असलेल्या श्री.मन्नाथ मंदिराच्या दिशेने गेली. वाटेत ताईंचे अनेक समर्थक, हितचिंतक आणि कार्यकर्ते स्वागत करून आम्ही कायम आपल्या सोबत आहोत, हा विश्वास दिला. शहरातील स्वागत व भेटीगाठी उरकून  परभणी मार्गे तीर्थक्षेत्र औंढा नागनाथकडे प्रस्थान केले यावेळी समाज पक्ष आणि आ.डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, समर्थक, व्यापारी, युवक, युवती, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या