🌟पुर्णेत प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त धार्मिक महोत्सवासह भजन गवळणींचा जंगी मुकाबला....!


🌟श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त उद्या दि.०६ सप्टेंबर रोजी  आयोजित धार्मिक कार्यक्रमात उपस्थित राहणार अनेक भजनी मंडळ🌟


पुर्णा (दि.०५ सप्टेंबर २०२३) - पुर्णा शहरातील सरदार विर भगतसिंघ चौक परिसरातील 'तेजबंद परिवाराकडून' दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त पारंपारिक पध्दतीने धार्मिक उत्सवाचे आयोजन केले जाते अनेक दशकापासून सुरु असलेली ही परंपरा जोपासत याही वर्षी तेजबंद परिवारातील तरुन पिढीतील सदस्य विद्यानंद तेजबंद व गोविंद तेजबंद यांनी उद्या बुधवार दि.०५ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ०८-०० वाजेच्या सुमारास श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर निमित्त गायीका संगीताताई  करमोडीकर करमोडीकर भजनी मंडळ व राधाताई पांचाळ आव्हईकर भजनी मंडळ यांच्या नव नवीन गवळणींचा जंगी मुकाबल्याचे भगतसिंघ चौक परिसरातील तेजबंद निवास येथे आयोजन केले आहे.

यानंतर श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दुसऱ्या दिवशी गुरुवार दि.०७ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ०१-०० ते सायंकाळी ०६-०० वाजेच्या दरम्यान महाप्रसादाचे देखील आयोजन केले आहे.तरी भाविक भक्तांनी भव्य भजन गवळनींसह महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन तेजबंद परिवाराकडून करण्यात आले आहे...... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या