🌟पुर्णेतील अर्थव्यस्थेची संपूर्ण सुत्र गाढवांच्या हाती ? एटीएम सुविधा केंद्रांवर गाढवांचे नियंत्रण....!

🌟बँक आँफ महाराष्ट्र व भारतीय स्टेट बँकांची एटीएम सुविधा केंद्र झाली गाढवांची आश्रयस्थान🌟


पुर्णा (दि.०८ सप्टेंबर २०२३) - पुर्णा शहरातील राष्ट्रीयकृत बँकांनी आपल्या एटीएम सुविधा केंद्रांची सुरक्षा व्यवस्था गाढवांच्या हाती दिली की काय ? असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत असून शहरातील महाविर नगर परिसरातील बँक आँफ महाराष्ट्र व भारतीय स्टेट बँकांची एटीएम सुविधा केंद्र जणुकाही गाढवांची आश्रयस्थान झाल्याचे निदर्शनास येत असून संबंधित एटीएम सुविधा केंद्रांमध्ये कधी गाढव तर कधी मोकाट गाई,वळू डुकर देखील आश्रय घेत असल्यामुळे एटीएम धारकांना पैसे काढण्यास गेल्यानंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून या एटीएम सुविधा केंद्रांमध्ये मोकाट गाढव आणि मोकाट गुर हागून घाण करीत असल्यामुळे प्रचंड दुर्गंधी सुटत असून अश्या परिस्थितीत एटीएम धारकांना नाका तोंडाला रुमाल बांधून एटीएम सुविधा केंद्रांतून पैसे काढावे लागत आहेत परंतु संबंधित बँकांचे अधिकारी/कर्मचारी मात्र या एटीएम केंद्रांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामूळे संबंधित बँक प्रशासनांनी अर्थव्यस्थेची संपूर्ण सुत्र गाढवांच्या हाती दिली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या