🌟पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथे ग्रामपंचायत प्रशासन व गावकऱ्यानी 'श्री गणेश महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केले श्रमदान....!


🌟मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून गावात राबवण्यात आली स्वच्छता मोहीम🌟


पुर्णा (दि.१७ सप्टेंबर २०२३) - पुर्णा तालुक्यातील मौ.धनगर टाकळी येथील ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांच्या वतीने आज रविवार दि.१७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून श्री गणेश महोत्सवाच्या पार्श्वभूमीव एक तास श्रमदान उपक्रम करीत गावात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.


यावेळी गावातील बस्टॅन्ड व मंदिर परिसरात एक तास स्वच्छता करण्यात आली. या वेळी ग्रामपंचायत टीम व गावातील नागरिक या सामाजिक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या