🌟पुर्णा तालुक्याती ताडकळस येथे राष्ट्रवादी व शिवसेनेला खिंडार : असंख्य कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश.....!


🌟ताडकळस येथे वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पक्ष प्रवेश सोहळा संपन्न🌟


पुर्णा (दि.११ सप्टेंबर २०२३) - महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवणारे प्रकाश आंबेडकर यांचे हात बळकट करण्याच्या उद्देशाने परभणी जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष तथा लोकसभा उमेदवार आलमगीर खान यांच्या नेतृत्वाखाली पुर्णा तालुक्यातीला ताडकळस मध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये पत्रकार फिरोज पठाण पत्रकार शमीम पठाण,तुकाराम शिंदे यांच्या सहित जवळपास शंभर कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्ष प्रवेश केला.


ताडकळस येथे वंचित बहुजन आघाडी मध्ये शेकडो नागरिकांनी जाहीर प्रवेश करणे हे पुढील येणाऱ्या राजकीय कारकिर्दीमध्ये काहीतरी बदल घडवण्याच्या उद्देशाने प्रवेश घेण्यात आला आहे  असे म्हणले जात आहे  शेकडो व्यक्तीचे वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करणे म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये राजकीय समीकरण निश्चितच बदलेन हे नाकारता येत नाही येणाऱ्या निवडणुका पंचायत समिती जिल्हा परिषद ला राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व भारतीय जनता पक्षाला याचा चांगलाच फटका बसणार आहे त्यामुळे पुढील राजकीय समीकरण काय होणार आहे याच्याकडे सगळ्याचे लक्ष वेधले  जातआहे पूर्णा तालुक्यातील ताडकळस हे जास्त लोकसंख्येचे मोठे ठिकाण असल्याने  वंचित बहुजन आघाडीचे नेते फारुख अहमद साहेब व आलमगीर  खान यांनी आम्ही ताडकळस कडे विशेष लक्ष देऊ असे सांगितले व नुकतेच जाहीर प्रवेश केलेले फिरोज पठाण यांनी प्रकाश आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याला सोबत घेऊन  ताडकळस परिसरामध्ये पक्ष वाढीसाठी अहोरात्र मेहनत घेण्याचे आश्वासन दिले पंधरा वर्षे शिवसेनेत काम केलेले फिरोज पठाण वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केल्यने आता  ताडकळस परिसरामध्ये राजकीय समीकरण बदलण्याचा अंदाज आहे ...

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कैलास शिवाजी मगरे यांनी भूषविले प्रास्ताविक सुनील मगरे ,सूत्रसंचालन शाहीर चंद्रकांत दुदमल यांनी तर शामसुंदर काळे यांनी आभार व्यक्त केले

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी फारूक अहमद राज्य उपाध्यक्ष तथा प्रवक्ते, आलमगीर खान माजी जिल्हाध्यक्ष सुनिता ताई साळवे महिला जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड युवा जिल्हाध्यक्ष परभणी सर्जेराव पंडित जिल्हा महासचिव मनोहर वावळे जिल्हा महासचिव रवी रावण वाघमारे जिल्हासचिव संजय बनसोडे सचिव परभणी श्याम सुंदर काळे तालुका अध्यक्ष पूर्णा सय्यद मसरत सय्यद जाणी शहराध्यक्ष पूर्णा कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास भिवाजी मगरे एडवोकेट हिरानंद गायकवाड लिंबाजी कनकटे मुख्य आयोजक  फिरोज पठाण, शमीम पठाण, तालुका उपाध्यक्ष,शुभम डहाळे,  सचिन मगरे ,राजेंद्र मगरे ,तुकाराम शिंदे, प्रसाद हनवते ,ज्ञानोबा हनवते, सरोदे ,गोरख हनवते, भारतबाई साळवे , क्रांती ताई वाघमारे, ज्योतीताई राम कस्तुरे ,राहुल कांबळे, गजानन कनकुटे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या