🌟प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर संपन्न....!


🌟या शिबिरामध्ये रक्तदाब,मधुमेह,हाडांचे विकार,सर्दी पडसे तापीसह सर्व छोट्या-मोठ्या आजारांवर करण्यात आली तपासणी🌟

परभणी (दि.०६ सप्टेंबर २०२३) - प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या वाढदिवसानिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने परभणी तालुक्यातील पाथरा येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर संपन्न झाले.


या शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, हाडांचे विकार, सर्दी पडसे ताप यांच्या सह सर्व छोट्या-मोठ्या आजारांवर मोफत तपासणी करून औषध उपचार करण्यात आला या शिबिरात गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून आरोग्य तपासणी करून घेतली या शिबिरात एकूण २९९ गावकऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घेतली शिवाय पाथरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पण आरोग्य तपासणी करण्यात आली.

या मोफत आरोग्य औषध उपचार शिबिरास पिंगळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.अमोल दीक्षित, डॉ. प्रवीण शिंदे, आरोग्य सेविका श्रीमती नरंजे, जया रवणवेंनी, आशा सेविका शोभा पलय, अंगणवाडी सेविका अर्चना गरुड, छाया शेवाळे, शाम गरुड, ओम नरवटे यांनी आरोग्य सुविधा पुरविली.

कार्यक्रमाला पाथरा गावाचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, चेअरमन, तंटा मुक्ती अध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, उपजिल्हाप्रमुख रामेश्वर जाधव तालुकाप्रमुख उद्धव गरुड, शहर प्रमुख अंकुश गिरी, सय्यद मुस्तफा, रामेश्वर पुरी, वैभव संघई, सय्यद अर्शद, सय्यद समीर, शेख उमेर, अंगद शिंदे, सय्यद इर्शाद, बाबुराव काळदाते, सय्यद रफिक, सय्यद आहात, गणेश कांबळे, सुधीर देशमुख, कृष्णा कांडे इत्यादी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या