🌟 शिवसेना नेते तथा मा.नगराध्यक्ष मो.हाजी कुरेशी यांच्या प्रयत्नांना यश : मुख्यमंत्र्यांनी केला ५० लाखांचा निधी मंजूर🌟
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पूर्णा शहरातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगर परिसरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहाच्या झालेल्या पडझडी संदर्भात मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधून या सांस्कृतिक सभागृहासाठी तात्काळ निधी मंजूर करावा अशी विनंती पुर्णा नगर परिषदेचे माजी माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष हाजी हाजी कुरेशी यांनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या विनंतीवरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांनी या सभागृहासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा केली.
या ५० लाख रुपयांच्या निधीतून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगर परिसरात लवकरच भव्य अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह उभारले जाणार असल्याचे शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष मो.हाजी कुरेशी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले या परिसरातील भव्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह बांधकाम करण्याची मागणी नागरिकांकडून गेल्या २५ वर्षापासून करण्यात येत होती परिसरातील नागरिकांच्या मागणीला प्राधान्य देऊन हाजी कुरेशी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्याकडून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याबद्दल त्याचं अण्णाभाऊ साठे नगर रहिवाशांच्या वतीने अभिनंदन होत आहे....
0 टिप्पण्या