🌟संबधीत अधिकाऱ्यांवर ऍट्रॉसिटी ऍक्ट नुसार तक्रार दाखल करणार - ऍड. सुभाष अंभोरे दुधगावांकर
परभणी (दि.२७ सप्टेंबर २०२३) - शैक्षणिक संस्था, देवस्थान, सेवाभावी संस्थाना अर्थात धर्मदाय उद्देशाने चालत असलेल्या नोंदणीकृत संस्थांना मा. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांनी एका रिट याचिकेत घर पट्टी करा पासून माफी दिली आहे. असे आदेश ही पारित करण्यात आले आहेत. ही बाब वारंवार मनपा परभणी ला निदर्शनास आणून देऊन सुध्दा शहरातील माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित रमाबाई आंबेडकर विध्यार्थी वसतिगृह डॉ आंबेडकर नगर या चॅरिटेबल ट्रस्ट मागासवर्गीय विध्यार्थी शैक्षणिक संस्थेला सूडबुद्धीने मानसिक व आर्थिक त्रास देण्याच्या उद्देशाने वारंवार घर पट्टी ची मागणी करत संस्थेची संपत्ती जप्त करण्याची नोटिसा देत आहेत. तसेच महानगर पालीका कर रजिस्टर मध्ये रमाबाई आंबेडकर विध्यार्थी वसतिगृह समोरील कर रकान्यात "कर माफी" असे नमुद करण्याबाबत तक्रार निवेदनात म्हंटले आहे.
तसेच वसतिगृह बाजूस असलेली तुंबलेल्या नालीचे घाण पाणी वसतिगृहात सोडण्यात येईल अशी भाषा करण्याऱ्या व मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहास वारंवार संपत्ती जप्ती ची नोटीस देऊन भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या मनपा प्रभाग समिती ब च्या अधिकाऱ्यांवर मा.सर्वोच्च न्यायालय, मा.उच्च न्यायालय यांच्या आदेशांचा अवमान केल्या बाबत संबधीता विरोधात ऍट्रॉसिटी ऍक्ट नुसार पोलिसात व मा.न्यायालयात तक्रार दाखल करण्या बाबत चे तक्रार निवेदन दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी आयुक्त तथा प्रशासक परभणी महानगरपालिका यांना संस्थेचे अध्यक्ष तथा आर.पी.आय. आठवले डोंबिवली शहर उपाध्यक्ष तथा दयावान सरकार डोंबिवली कार्याध्यक्ष तथा कार्यकारी संपादक समाजहित न्यूज ऍड.सुभाष अशोकराव अंभोरे दुधगांवकर यांनी दिले आहे.
त्याच बरोबर आज दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी मा. जिल्हाधिकारी परभणी, मनपा उपायुक्त, मनपा सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती ब, कर निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक प्रभाग समिती ब आदींना देण्यात आले आहे.
ऍड. सुभाष अंभोरे दुधगांवकर हे समाजहित न्यूजशी बोलताना म्हणाले कि, मनपा आयुक्त तथा प्रशासक यांनी मागासवर्गीय वसतिगृहास न्याय देण्यास व संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात कसूर केल्यास संबधीत अधिकाऱ्यांवर लवकरच पोलिसात व मा.न्यायालयात ऍट्रॉसिटी ऍक्ट नुसार तक्रार दाखल करण्यात येईल असे बोलले.
या प्रकरणात महानगरपालिका मा.आयुक्त तथा प्रशासक तृप्ती सांडभोर या संबंधित मनमानी कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात? या कडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष आहे....
0 टिप्पण्या