🌟सनी शिंदे,विकास गावकर यांची डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड🌟
मुंबई (दि.१६ सप्टेंबर २०२३) : मराठी पत्रकार परिषदेची नवीन विंग डिजिटल मिडिया परिषद पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच निवडी जाहीर करण्यात आल्या असून यामध्ये सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून पाहिलेले सनी (संतोष) शिंदे आणि सिंधुदुर्ग येथील पुढारी चॅनलचे ब्युरो चीफ विकास गावकर यांची डिजिटल मिडिया परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केली आहे.
सनी शिंदे यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची आणि विवेक गावकर यांच्याकडे कोकण विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सनी शिंदे यांनी डिजिटल मिडिया परिषदेचं भक्कम संघटन सातारा जिल्ह्यात उभारलं आहे. जिल्ह्यातील युट्यूब चॅनल्स आणि पोर्टलचे संपादक परिषदेच्या झेंड्याखाली एकवटले आहेत. विविध उपक्रम राबवून त्यांनी संघटन मजबूत केले. त्यामुळे राज्य उपाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात येत आहे. गावकर यांनीही सिंधुदुर्ग जिल्ह्यात डिजिटल मिडियातील पत्रकारांना एकत्र करण्याची जबाबदारी पार पाडली आहे.
प्रदेश उपाध्यक्ष म्हणून उभयतांनी अनुक्रमे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात संघटन उभारणे, मजबूत करणे, दौरे करणे, नवीन पदाधिकार्यांच्या नियुक्तीसाठी नावांची वरिष्ठांकडे शिफारशी करणे आदि कामे करायची आहेत सातारा येथे लवकरच डिजिटल मिडिया परिषदेची कार्यशाळा होत आहे. जिल्हा पत्रकार संघाच्या समन्वयातून ही कार्यशाळा यशस्वी करण्याची जबाबदारी देखील सनी शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. कार्यशाळेच्या वेळेस राज्य कार्यकारिणी निवडण्यात येईल.
परिषदचे अध्यक्ष शरद पाबळे, विश्वस्त किरण नाईक, डिजिटल मिडिया परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, राज्य प्रसिद्धी प्रमुख संदिप कुलकर्णी, सह प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांनी सनी शिंदे आणि विकास गावकर यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत....
0 टिप्पण्या