🌟पुर्णेतील पर्यावरण प्रेमी व कलावंत परशुराम उर्फ बाळू जोगदंड यांनी बनवली मातीची सुंदर श्री गणेशाची मुर्ती....!


🌟त्यांच्या या आगळ्यावेगळ्या व कौतुकास्पद उपक्रमामुळे येणाऱ्या भावी पिढीला फार मोठी प्रेरणा मिळत आहे🌟


पुर्णेतील पर्यावरण प्रेमी व कलावंत परशुराम उर्फ बाळू जोगदंड हे मागील अनेक वर्षांपासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती मूळे होणारा पर्यावरणाचा हयास व गणेश मूर्तीची अवहेलना थांबवण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकत पर्यावरणाचे महत्व लक्षात ठेवून स्वतःच्या हाताने चिखलाचा सुंदर गणपती तयार करून प्रत्येक वर्षी 'गणेश महोत्सव' आनंदाने साजरा करतात त्यांच्या या आगळ्यावेगळ्या व कौतुकास्पद उपक्रमामुळे येणाऱ्या भावी पिढीला फार मोठी प्रेरणा मिळत आहे.

परशुराम उर्फ बाळू जोगदंड हे सामाजिक/धार्मिक/राजकीय क्षेत्रासह सदैव तत्पर पर राहणार व्यक्तीमत्व असून ते मागील अनेक वर्पाषांपासून गणेश महोत्सव साजरा करतेवेळी स्वतःच्या हस्ते मातीची श्री गणेशाची मूर्ती बनवून गणेश महोत्सव साजरा करतात व समाजाला पर्यावरणाचा समतोल राखण्याच संदेश देतात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नदीपात्रात विसर्जन करून पाणी दूषित करण्यापेक्षा शाडूची/मातीची मूर्ती पूजन करून नंतर कृत्रिम तलावात विसर्जन करणे ही काळाची गरज असल्याचे मत ते आवर्जून मांडतात.

पारंपारिक शाडूच्या मूर्ती ऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा वापर तसेच सजावटीसाठी थर्माकोलचा वापर हा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी घातक आहे. रासायनिक रंगाचा वापर यामुळे जलप्रदूषण होऊन मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होते. पाण्यात न विरघळणाऱ्या व भंगलेल्या गणेश मूर्ती बघून खऱ्या गणेश भक्तांचे मन सुन्न झाल्यापासून राहत नाही. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती मूळे होणारा पर्यावरणाचा हयास व गणेश मूर्तीची अवहेलना थांबवण्यासाठी प्रत्येकाने शाडू मातीच्या गणेश मूर्तीचा वापर करावा असे आवाहन निसर्गप्रेमीं/पर्यावरण प्रेमी कलावंत परशुराम उर्फ बाळू जोगदंड यांचं म्हणणं आहे.त्यांच्या या कौतुकास्पद कार्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या