🌟पुर्णेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन व भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त मॅरेथॉन स्पर्धा संपन्न....!


🌟औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचे करण्यात आले होते आयोजन🌟


पुर्णा (दि.१७ सप्टेंबर २०२३) - मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन व भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त तसेच विश्वकर्मा जंयतीचे औचीत्य साधुन कौशल्य विकास विभाग महाराष्ट्र शासन व मा. मंगलप्रभात लोढा मंत्री कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांच्या संकल्पनेतुन व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाव्दारे आयोजीत पिएम स्किल रण ०५ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धा औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुर्णा यांच्या व्दारे अत्यंत उत्साहाच्या वातावरणात आज रविवार दि.१७ सप्टेंबर २०२३ रोजी संपन्न झाली.

या स्पर्धेत मुलांच्या गटात प्रथम क्रमांकाने कुणाल साबळे १६.२५ मिनीटात तसेच व्दितीय मुगाजी सोळंके १६.३९ मिनीट,तृतीय शेख सदाम १७.१८ मिनीट,चौथा क्रमांक विजय साखरे १७.२२ मिनीट,पाचवा क्रमांक अनिल पर्वते,सहावा क्रमांक तेजस कापुरे १८.३५ मिनीट तसेच मुलींच्या गटात प्रथम क्रमांक अनुराधा साखरे २२.३० मिनीट,व्दितीय द्रोपदी ढोणे २४.२७ मिनीट,तृतीय क्रमांक अंकीता कदम २४.५९ मिनीट,चौथा क्रमांक पद्मजा कोमटवार, पाचवा क्रमांक श्रध्दा कदम २६.१९ मीनीट, सहावा क्रमांक राणी वाघमारे हे स्पर्धेक विजयी झाले असुन या स्पर्धेत मुले व मुली आदी ९० स्पर्धेकांनी सहभाग नोंदविला तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पुर्णा येथून अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा २०२३ मधील सर्व उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांचा पदवीदान समारंभ औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुर्णा येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य पी.के.अन्नपुर्णे तर उदघाटक म्हणुन पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक श्री प्रदीपजी काकडे, तर प्रमुख पाहुणे म्हणुन स्थानीक उद्योजक  अभिजीत रणविर,जेष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड उपस्थित होते. प्रमुख उपस्थिता मध्ये स्थानिक नगरसेवक सुधाकर खराटे, वसंत कऱ्हाळे आदी उपस्थित होते.

या स्पर्धेच्या बक्षिस व पदवीदान समारंभास प्रमुख पाहुणे पो.नि.प्रदीपजी काकडे यांच्या हस्ते संपन्न झाला. सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थांचे अतीप सौदागर, मुलगीर अशोक, राउत ऋषीराज, उमरीकर कैलास नागरे विलास, रेकुलवार गणेश, मेहेत्रे गजानन, शेळके काशीनाथ, वल्लमवाड आसाराम, श्रीमती जशोदा वाघेले आदीनी परीश्रम घेतले असुन ही मॅरेथॉन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेजर ध्यानचंद स्पोर्टस अकॅडमी चे प्रा. डॉ. महेश जाधव श्री ज्ञानेश्वर बोकारे यांनी पंच प्रमुख म्हणून काम पाहीले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या