🌟मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त राजगोपालचारी उद्यान येथे ध्वजारोहन....!


🌟मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होणार मुख्य ध्वजारोहण🌟

परभणी (दि.15 सप्टेंबर 2023) : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त्त रविवार, दि. १७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजता राजगोपालचारी उद्यान, परभणी येथे राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

 तत्पूर्वी त्याच ठिकाणी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात येणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रम समारंभाला येताना राष्ट्रीय पोषाख परिधान करून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

* प्रशासकीय इमारत येथे ध्वजारोहण समारंभ :-

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार, दि. १७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी 7.30 वाजता प्रशासकीय इमारत, परभणी येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या हस्ते पार पडणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम समारंभाला येताना अधिकारी-कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पोषाख परिधान करून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या