🌟गेल्या २४ तासात या परिसरात ६४ मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झाली🌟
परभणी : परभणी जिल्ह्यातील पुर्णा पाटबंधारे प्रकल्पा अंतर्गत असलेल्य येलदरी प्रकल्पाच्या परिसरात तसेच पाणलोट क्षेत्रातील पडलेल्या पावसाने जलाशयातील पाणी पातळीत साडेतीन दशलक्ष घनमीटर एवढी वाढ झाली आहे.
या जलाशयाच्या परिसरात व पाणलोट क्षेत्रात पावसाने दीर्घकाळ विश्रांती घेतली. परंतु, गुरुवारपासून पाऊस सुरु झाला. गेल्या २४ तासात या परिसरात ६४ मिलीमीटर एवढी पावसाची नोंद झाली. त्यामुळे येलदरीच्या जलाशयातीलसुध्दा पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, उर्वरीत पावसाच्या कालखंडात हे जलाशय निश्चितपणे भरेल, असा विश्वास या भागातील जाणकार मंडळी व्यक्त करीत आहेत.....
0 टिप्पण्या