🌟परभणी जिल्ह्यात रविवारी ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसा’चे आयोजन....!


🌟अशी माहिती माहिती विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे🌟

 परभणी (दि.२८ सप्टेंबर २०२३) : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने रविवारी, १ ऑक्टोबर हा दिवस राज्यात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार छत्रपती संभाजीनगर विभागामधील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये १ ऑक्टोबर हा दिवस राज्यात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. 

ज्येष्ठ नागरिकाचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृद्धापकाळ चांगल्या तऱ्हेने  घालविता यावा. समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे. शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे. वृद्धापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण शासनाद्वारे ठरविण्यात आले आहे. या शासन निर्णयातील तरतुदीनुसार छ.संभाजीनगर विभागामधील सर्व जिल्ह्यात सार्वजनिक पदयात्रा, प्रभातफेऱ्या, सभा, विशेष कार्य केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या बिगर सरकारी संस्थाचा सत्कार, गौरव, आरोग्य शिबिरे, चर्चासत्र, परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक उपायुक्त श्रीमती सोनकवडे यांनी सांगितले......  

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या