🌟‘महाराष्ट्राची लोकधारा’ने मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाचा जल्लोषात समारोप.....!


🌟मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या आयोजनात यंत्रणेचा उत्तम समन्वय - जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


परभणी : मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेसह जिल्हा यंत्रणेच्या विविध विभागांनी उत्तम समन्वय ठेवून काम केल्याचे प्रशंसोद्गार जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी काढले. 


मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा समारोपीय कार्यक्रम बी. रघुनाथ सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. गावडे बोलत होते कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे सहकुटूंब उपस्थित होते. महानगर पालिका आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, उप विभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, अपर जिल्हा कोषागार अधिकारी नीळकंठ पाचंगे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. 

मराठवाडा मुक्तिसंग्रामातील विविध कार्यक्रमाचे चार दिवस आयोजन करण्यात आले. या अतिशय देखण्या कार्यक्रमांमध्ये रांगोळी स्पर्धांपासून एकता दौड, सायकल रैली, काव्यवाचन, आणि आज सांस्कृतिक कार्यक्रमामुळे हा महोत्सव उत्तरोत्तर खुलत गेला असल्याचे सांगत, या सर्व कार्यक्रमांची विभागीय आयुक्तांनी प्रशंसा केली आहे. त्यांचा शुभेच्छासंदेश आपल्यापर्यंत पोहचवत असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी उपस्थितांना सांगितले. 


गेल्या चार दिवसांपासून आपण सर्वजणांनी योग्य समन्वय ठेवल्यामुळे सर्वच सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय उत्तम होत असून, कार्यक्रमातील सर्व कलावंताना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी शुभेच्छा दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी, तहसीलदार श्रीराम बेंडे, अपर जिल्हा कोषागार अधिकारी नीळकंठ पाचंगे यांच्यासह जिल्हा यंत्रणेतील अधिकारी -कर्मचारी आणि संजय पांडे, प्रकाश बारबिंड, शेख जावेद, प्रमोद बल्लाळ आणि रमाकांत कुलकर्णी यांच्यासह सर्वांनी समन्वय ठेवत काम केले असल्याचे सांगत जिल्हाधिका-यांनी विजेत्यांचे कौतुक केले. तसेच त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्राची लावणी, गोंधळ, देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण आदी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने मुक्तिसंग्रामाचा जल्लोषात समारोप झाला. आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर यांनी मनपाच्या वतीने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचा सपत्नीक सत्कार केला. 


कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठवाडा गीताची धून वाजविण्यात आली. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत लक्ष्मी लहाने आणि शेख जावेद यांनी गायले. त्यानंतर गंगाखेड येथील राधे रायडर्सने गणेशवंदना सादर करत सभागृहात भक्तिमय वातावरणनिर्मिती केली. नाना काटे व कलासंचाने गणपती श्रवणगीत सादर केले तर राजारामबापू कदम गोंधळी कलासंघाने ‘अंबाबाईचा गोंधळ’ घालून उपस्थितांची दाद मिळविली. त्यानंतर पुन्हा एकदा सभागृहातील कलामंचावर गंगाखेड येथील राधे रायडर्सच्या सादरकर्त्या कलासंघाने 'गजर माऊलीचा, ....माऊली माऊली' ही वारकरी नृत्यदिंडी सादर करत पंढरपुरातील विठ्ठल रखुमाईचे सभागृहातील उपस्थितांना दर्शन घडविले. 

परभणी येथील ज्ञानदीप विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘देश रंगीला रंगीला’ या गीतावर नृत्य केले. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टारची स्टार’ फेम परभणीतील प्रांजल बोधक हीने ‘प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा’ आणि ‘तेरी मिट्टी मे मिल जावा’ हे गीत सादर केले. त्यानंतर श्रावणी मुंडकर या सातव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने 'अवतरली सुंदरा.....चंद्रा' ही बहारदार लावणी सादर केली. ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे देशभक्ती गीत लक्ष्मी लहाने यांनी सादर करत उपस्थितांना स्तब्ध केले. त्यासोबत शेख जावेद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा आणि आगमनाची वर्दी आपल्या भरजरी आवाजातून सादर केली. त्यानंतर पुन्हा एकदा गंगाखेडातील राधे रायडर्सने नृत देशभक्तीवर फ्यूजन सादर केले. त्याशिवाय 'हादरली ही धरती, थरथरले आसमान, एकमुखाने बोला बोला जय जय हिंदुस्थान' या गीताने मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढ्यात सहभागी स्वातंत्र्यसैनिकांप्रती झोडपे यांनी पोवाडा सादर करत आदरांजली वाहिली. तर ‘तुळजापूरची आई अंबाबाई गोंधळाला यावं' हा राजारामबापू कदम कलासंघाने गोंधळ सादर केला. 

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवानिमित्त परभणी महानगरपालिकेने चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. या रांगोळी स्पर्धेच्या खुल्या गटामध्ये प्रथम पारितोषिक कु. वैष्णवी अनिल पांचाळ, द्वितीय पारितोषिक कु. गायत्री त्रिंबक डासाळकर, तृतीय पारितोषिक कु. समृद्धी दत्तराव सूर्यवंशी तसेच उत्तेजनार्थ कु. कल्पना प्रभाकर शिरोळे व कु. साक्षी राजेश्वर चव्हाण यांना मिळाले. रांगोळी स्पर्धा बारा ते अठरा वर्ष खालील गटामध्ये प्रथम पारितोषिक कु. स्नेहा प्रभाकर बिडवे, द्वितीय पारितोषिक कु. अमोल्या प्रमोद जहागीरदार, तृतीय पारितोषिक अंजली माणिकराव गरुड, उत्तेजनार्थ कु. स्नेहल पंडित गायकवाड, संस्कृती चंद्रशेखर गायकवाड, कु. मारीसा कैलास वाघमारे यांना मिळाले. 

नानाभाऊ काटे आणि त्यांचा कलासंच, लक्ष्मी लहाने, प्रांजल बोदक, रामदास कदम आणि त्यांचा कलासंच, गंगाखेड राधे रायडर्स अकादमीचा कलासंच, किरण राठोड आणि त्यांचा कलासंच, सौरभ वरवडे, गौरी कुरुंदकर, चंद्रकांत पवार, रवी राठोड, शेख जावेद शेख सादिक, उदय वायकर, सरोज देशपांडे, किशोर पुराणिक, अबोली जोशी, क्रांति पैठणकर, सुवर्णा मुळजकर, कलाशिक्षक मनोज लग्गड, राधे आवाड, किरण राठोड, अमोल राठोड, रवी राठोड, गणेश ढगे, रितीका लटपटे, अधिराज प्रधान, राज तुपे, हर्षद भंडारे, आदिती पाटील,प्रतीक्षा भंडारे, जयदीप कांबळे, संभाजी बोमशेटे, रोहन फड, संदीप पवार, पूनम काजे, अर्चना डावरे, अबेाली जोशी, महेश देशमुख वत्सला पाटील आदींसह इतर उपस्थितांचा समावेश होता. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सहभागी सर्व कलावंतांना सन्मानित करण्यात आले.

सरदार वल्लभभाई पटेल, स्वामी रामानंद तीर्थ, बी. रघुनाथ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण वायकोस, तर समन्वयक प्रमोद बल्लाळ यांनी काम पाहिले......  

 

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या