🌟परभणी जिल्ह्यातील १४ वर्षीय विद्यार्थ्याचे खंडणीसाठी अपहरण करून मागणी पुर्ण न झाल्याने केली निर्घृण हत्या...!


🌟नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातल्या माळाकोळी येथील तलावात फेकला मृतदेह🌟 

नांदेड/परभणी (दि.८ सप्टेंबर २०२३)-परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातील माटेगाव येथील राहणाऱ्या व परभणीतील 'पौळ वस्तीगृहात' वास्तव्यास राहून येथील गांधी विद्यालय या शाळेत इयत्ता ०९ वीत शिक्षण घेत असलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन बालकाचे खंडणीसाठी परभणी शहरातून अपहरण करुन त्याची अत्यंत निर्दैयीपणे हत्या करण्यात आल्याचा गंभीर प्रकार आज दि.८ सप्टेंबर २०२३ रोजी उघडकीस आला मयत बालकाचा मृतदेह परभणी पोलिसांनी लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील एका तलावातून ताब्यात घेतला आहे.

पूर्णा तालुक्यातील माटेगाव येथील प्रकाश बोबडे यांचा मुलगा परमेश्वर प्रकाश बोबडे हा परभणी शहरातील परभणी गांधी विद्यालय या शाळे मध्ये इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत होता. तर वसमत रोडवरील पौळ वसतिगृहात तो राहत होता. दि.७ सप्टेंबर रोजी दुपारी तो वसतिगृहातून गायब झाला. ही बाब त्याच्या आई-वडिलांना समजल्याने त्यांनी परभणी शहरातील नवामोंढा पोलीस ठाण्यात नोंद केली. दरम्यान मध्यरात्री बारा वाजता बालाजी चव्हाण या नावाने प्रकाश बोबडे यांना एक फोन आला. तुमचा मुलगा आमच्या ताब्यात असल्याचे सांगत पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितली. यानंतर प्रकाश बोबडे यांनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी मोबाईल नंबरवरुन बालाजी चव्हाण व अन्य एकास अटक केली. पोलिसांनी यांची कसून चौकशी केली असता परमेश्वर बोबडे यास तलावात फेकून दिल्याचे आरोपींनी सांगितले. आरोपीच्या सांगण्यावरुन परभणी पोलिसांनी माळाकोळी येथील एका तलावातून परमेश्वर प्रकाश बोबडे या बालकाचा मृतदेह ताब्यात घेतला. पुढील कारवाई परभणी पोलीस करीत आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या