🌟परभणी जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक रागसुधा आर. यांचा वाढदिवस भाजीपाला उत्पादक ग्रुपच्या वतीने साजरा...!


🌟यावेळी वाढदिवसा निमित्त ग्रुपच्या वतीने स्वतः तयार केलेले प्रॉडक्ट भाजीपाला व गृहउपयोगी साहित्याची त्यांना भेट🌟


परभणी जिल्ह्याच्या कार्याध्यक्ष अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुधा आर.यांचा वाढदिवस भाजीपाला उत्पादक ग्रुपच्या वतीने वितर काही न देता पपई कापून साजरा केला व स्वतः तयार केलेले प्रॉडक्ट भाजीपाला व गृहउपयोगी साहित्य भेट देऊन अनोखा वाढदिवस साजरा केला.


परभणी क्षेत्रातील अपहरण प्रकरणातील गुन्हेगारीस मोठ्या प्रमाणात आळा घातल्यामुळे अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. अशा कर्तव्यदक्ष आणि स्वत: कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थी असल्यामुळे त्यांना शेतीचे विशेष आवड आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकर्‍यांसमोर एक आदर्श ठरत आहेत. त्यामुळे परभणीतील शेतकरी त्यांच्या सहवासात आवर्जुन उपस्थिती दार्शवितात. याप्रसंगी परभणी जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकर्‍यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पंडित थोरात प्रकाश हरकळ, शिवाजी शिराळे, विजय जंगले, स्वाती घोडके, जनार्धन आवरगंड, संभाजी गायकवाड सुदाम माने आदी शेतकरी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या