🌟मंगल मैत्रीची भावना मानवाला सद्गगतीकडे घेऊन जात असते....!

 


🌟भिक्खु महाविरो थेरो यांचे प्रतिपादन🌟

पुर्णा : पुर्णा येथील बुध्द विहारात दि.२८ सप्टेंबर २०२३ या दिवशी भाद्रपद पौर्णिमेनिमित्त धम्मदेशना व सत्कार समारंभाचे अखिल भारतीय भिकू संघाचे कार्याध्यक्ष पूज्य भदंत डॉ. उपगुप्त महास्थविर भदंत पयावंश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते.सकाळी साडेपाच वाजता त्रिशरण पंचशील परित्राण व सूत्र पठण भिकू संघाच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने श्रद्धा संपन्न उपासक उपासिकांची उपस्थिती होती दुपारी साडेबारा वाजता सामूहिक त्रिरत्न पूजा पाठ धम्मदेशना व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.


नांदेड वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले प्रदूषण नियंत्रण मंडळ दिल्लीचे संचालक  अनिल रणवीर इंदिरा गांधी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित रणवीर नांदेड येथील प्रा. डॉक्टर अविनाश नाईक परभणी येथील ज्येष्ठ धम्म उपासक तू प सुंदर आदींची उपस्थिती होती.प्रमुख सत्कारमूर्ती म्हणून एडवोकेट हर्षवर्धन सोपान ढगे नवनियुक्त सरकारी वकील हे होते.

आपल्या प्रमुख धम्मदेशनेमध्ये भिकू महाविरो थेरो यांनी तथागत भगवान बुद्धांच्या मंगल मैत्रीचे महत्त्व विशद करत असताना सांगितले प्रत्येक मानवाचे अंगी विनम्रता असली पाहिजे अहंकार व मीपणा पासून कोसो दूर असले पाहिजे माना पानाची कोणतीही अपेक्षा असू नये.यासंदर्भामध्ये त्यांनी तथागत भगवान बुद्धांचे विश्वासू शिष्य भदंत आनंद व बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध प्रसंगाचे वर्णन केले.डॉ.उपगुप्त महाथेरो यांनी भिकू महावि रो थेरो व प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला.बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा व महिला मंडळाच्या वतीने भिकू संघ व प्रमुख पाहुण्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले.

या वेळी सुप्रसिद्ध आंबेडकर विचारवंत प्रकाश कांबळे विहार समितीचे सचिव एडवोकेट महेंद्र गायकवाड भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष शामराव जोगदंड अमृतराव मोरे टी झेड कांबळे मुगाजी खंदारे पत्रकार विजयराव बगाटे इंजिनीयर पीजी रणवीर सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड  साहेबराव सोनवणे कॉन्ट्रॅक्टर गौतम भोळे अतुल गवळी बौद्धाचार्य उमेश बारहा टे सोपा न ढगे बाबाराव वाघमारे वारा काळे पंडित डोंगरे थोरात मामा शाहीर गौतम कांबळे आदींची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राम भालेराव सुरज जोंधळे राजू जोंधळे सोनू काळे बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा व महिला मंडळांनी  परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या