🌟परभणी जिल्हा महावितरणचे अधिक्षक अभियंता यांची गंगाखेडचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी घेतली सकारात्मक भेट....!


🌟मतदार संघातील वीजेच्या समस्यांसह अडचणी संदर्भात केली चर्चा🌟


गंगाखेड विधानसभेचे कर्तव्यदक्ष आ.डॉ.रत्नाकर‌ गुट्टे यांनी आज शुक्रवार दि.०८ सप्टेंबर रोजी परभणी जिल्हा महावितरणचे अधिक्षक अभियंता यांची परभणीत भेट घेतली. 

 पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शहरी व ग्रामीण भागात विजेचा सातत्याने होणारा लंपडाव त्यामुळे नागरिकांचे हाल होतात त्यातून सर्वसामान्य लोकांची महावितरण कंपनी विषयी नेहमी ओरड किंवा तक्रार असते, असेही आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी अधिक्षक अभियंता यांच्या कानावर घातले याप्रसंगी दोघांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. मतदार संघातील वीजेच्या समस्या,अडचणी, प्रश्न त्यांच्या समोर आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी मांडल्या त्यावर अधीक्षक अभियंता यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या