🌟शिवसेना संपर्क प्रमुख मा.खा.ॲड.सुरेश जाधव यांनी घेतले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी गणरायाचे दर्शन...!


🌟यावेळी मुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे यांनी मा.खासदार जाधव व त्यांच्या सौभाग्यवती रमाताई जाधव यांचे स्वागत केले🌟

मुंबई (दि.२९ सप्टेंबर २०२३) परभणी जिल्ह्याचे माजी खासदार तथा शिवसेना संपर्क प्रमुख ॲड.सुरेशराव जाधव पाटील व त्यांच्या सौभाग्यवती रमाताई सुरेशराव जाधव यांनी बुधवार दि.२७ सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री भाई एकनाथराव शिंदे यांच्या मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन गणपती बप्पाचे दर्शन घेतले.

यावेळी मुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे यांनी मा.खासदार जाधव व त्यांच्या सौभाग्यवती रमाताई जाधव यांचे स्वागत केले यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी शिवसेना संपर्क प्रमुख तथा मा.खा.जाधव यांनी परभणी जिल्ह्याच्या विकासासह शिवसेना पक्षाच्या बांधणी संदर्भात देखील सकारात्मक चर्चा केल्याचे समजते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या