🌟गंगाखेड तालुक्यातील मालेवाडी गावास केंद्र शासनाच्या पथकाची भेट....!


🌟प्रुरुफ ऑफ कन्सेप्ट(POC) ही संकल्पना राबविण्यासाठी केंद्र शासनाचे पथक मालेवाडी गावात चार दिवस होते🌟


गंगाखेड (दि.२७ सप्टेंबर २०२३) - प्रुरुफ ऑफ कन्सेप्ट(POC) ही संकल्पना राबविण्यासाठी केंद्र शासनाचे पथक मालेवाडी गावात चार दिवस होते. महाराष्ट्र राज्यातील तीन गावांमध्ये (poc) या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील तीन गावांमध्ये परभणी जिल्ह्यातून तालुका गंगाखेड मधील मालेवाडी तसेच अमरावती  जिल्ह्यातील रासेगाव व औरंगाबाद जिल्ह्यातील कोट नांद्रा या गावाची केंद्र शासनाने निवड केलेली होती.  प्रूफ ऑफ कन्सेप्ट या संकल्पनेतून पंतप्रधान किसान सन्माननिधी योजनेअंतर्गत देय असलेल्या लाभासाठी लाभार्थ्याची नोंदणी वाढविण्यास वाव असल्याने भारत सरकार आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांनी प्रुफ ऑफ कन्सेप्ट ही संकल्पना गंगाखेड तालुक्यातील मालेवाडी गावात दिनांक 20 सप्टेंबर पासून ते 23 सप्टेंबर पर्यंत ही संकल्पना राबविण्यात आली. यासाठी भारत सरकार संसाधन व्यक्ती मा.श्री विनय बिरमनजी, यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक श्री बालाजी कोरडे, रमेश फड, विजय मतलाकुटे नितीन धुळे, मारुती गायकवाड, नरेंद्र ठाकरे, अमोल इंगळे,तलाठी अशोक कुगणे,  संतोष इप्पर, गलांडे  इत्यादी नी(Consent Collecotr,व Farmer registry)या दोन प्रकारच्या ॲपमध्ये गावातील शेतकरी बांधवांची नोंद केली. तसेच(POC) संकल्पना यशस्वी करण्यासाठी गावातील, उत्तमराव कुकडे, पोलीस पाटील विठ्ठल कुकडे, उपसरपंच उमेशसिंग चंदेल, गोविंद सिंग चंदेल, ज्ञानेश्वर साठे, भानुदास शिंदे, आनंद सिंग चंदेल, इत्यादींनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या