🌟कर्तृत्ववान लोकप्रतिनिधी श्रीमती फौजिया खान यांच्या मुळे संपूर्ण देशांमध्ये परभणीची मान निश्चितच उंचावली आहे🌟
परभणी (दि.२२सप्टेबर २०२३ - परभणी जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिला लोकप्रतिनिधी तथा राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या राज्यसभेच्या सन्मानिय खासदार म्हनुन तब्बल दोन वेळेस संसररत्न पुरस्काराने सन्मानित खा.डाॅ फौजिया खान यांनी राज्यसभेचे उपसभापती पद भुषविले आहे. यामुळे कर्तृत्ववान लोकप्रतिनिधी श्रीमती फौजिया खान यांच्या मुळे संपूर्ण देशांमध्ये परभणीची मान निश्चितच उंचावली आहे.
राज्यसभेत काल गुरुवार दि.२१ सप्टेंबर २०२३ मध्ये झालेल्या कामकाजामध्ये राज्यसभा सदस्या डॉ.फौजिया खान या उपसभापती पदी विराजमान झाल्या. लोकसभा व विधानसभेमध्ये महिला आरक्षणावरील अधिनियमावर होत असलेल्या चर्चेत त्या किती अभ्यासु आहेत तसेच त्यांची महिला सक्षमीकरण बाबत असलेली तळमळ व जागरूकता या त्यांच्या उपसभापतीपदाच्या कामकाजामधुन दिसून येते. त्यामुळे देशात आणि देशातच नव्हे तर संपूर्णजगात निश्चितपने आजच्या या कामातून परभणीचे स्थान उज्वल झाले आहे......
0 टिप्पण्या