🌟परभणी जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय फुटबॉल स्पर्धेत सेंट अगस्टीन प्रथम....!


🌟फुटबॉल स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावल्या बद्दल  सेंट अगस्टाईन इंग्लिश स्कूलच्या मुलांचे होत आहे कौतुक🌟 

परभणी (दि.23 सप्टेंबर 2023) : परभणी महानगर पालिका व परभणी जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 14, 17 व 19 वर्ष वयोगटातील मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत सेंट अगस्टाईन इंग्लिश स्कूलच्या मुलांच्या संघाने 14 वर्ष वयोगटात, देवगिरी ग्लोबल अकादमीच्या मुलीच्या संघाने 14 वर्ष वयोगटात तर डॉ. झाकीर हुसेनच्या मुलांच्या संघाने 17 वर्ष वयोगटात, मॉडेल उर्दू स्कूलच्या मुलींच्या संघाने 17 वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक पटकाविला. तर 17 वर्ष वयोगटातील मुलींच्या स्पर्धेत डॉ. झाकीर हुसेन हायस्कूलच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला.

          महानगरपालिका व हौशी हॉकी असोसिएशनने आयोजित केलेल्या शालेय हॉकी स्पर्धेत डॉ. झाकीर हुसेन हायस्कूलच्या 17 वर्ष वयोगटातील मुला-मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. 14 व 19 वयोगटातील स्पर्धांमध्ये एकही संघ सहभागी झाला नाही.

           हॉलीबॉलच्या स्पर्धेत 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या संघात जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयाने प्रथम तर सेमी इंग्लिश स्कूलच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. 14 वर्षाखालील मुलींच्या संघात सेंट अगस्टीन स्कूलच्या संघाने प्रथम तर बालविद्या मंदिरच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. 17 वर्षाखालील मुलींच्या संघात बालविद्या मंदिरने प्रथम, जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयाने द्वितीय तर 17 वर्षाखालील मुलांच्या संघात प्रेसिडेन्सी इंग्लिश स्कूलने प्रथम व भारतीय बालविद्या मंदिरने द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच 19 वर्षाखालील मुलांच्या संघात शिवाजी महाविद्यालयाने प्रथम, ज्ञानोपासक महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावला. तर 19 वर्षाखालील मुलींच्या संघात ज्ञानोपासक महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या