🌟गंगाखेडचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते कामगार सुरक्षा कीट नावनोंदणी शिबीराचे उद्घाटन संपन्न.....!


🌟गंगाखेड शहरातील राम-सीता सदन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते🌟


गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय व कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते आज शुक्रवार दि.१५ सप्टेंबर २०२३ रोजी कामगार सुरक्षा कीट नावनोंदणी शिबीराचे उद्घाटन संपन्न झाले. 


महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सुरक्षा कीट (पेटी) लाभार्थी नावनोंदणी कार्यक्रमाचे आयोजन शासकीय योजना मदत केंद्राच्या वतीने गंगाखेड शहरातील राम-सीता सदन येथे केले आहे. 

त्यामध्ये नावनोंदणी करण्यासाठी लाभार्थ्यांचे वय १८ ते ६० वर्ष असायला हवे. आधारकार्ड, कामगार नोंदणी कार्ड, नोंदणी व नुतनीकरण पावती अशी सर्व कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी चार झेरॉक्स तसेच एक पासपोर्ट साईज फोटो घेवून स्वतः उपस्थित राहून नावनोंदणी शिबीराचा लाभ घ्यावा,असेही कर्तव्यदक्ष आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी केले आहे या नावनोंदणी शिबिरास शहरी व ग्रामीण भागातील कामगार बंधु आणि भगिनींनी मोठी गर्दी केली होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या