🌟शिक्षण क्षेत्रातील तळागळातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी सातत्याने धडपडणारे आदर्श शिक्षक...!


🌟पुर्णा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व आदर्श शिक्षक आबनराव पारवे सरांचा आज अभिष्टचिंतन सोहळा🌟

पुर्णा तालुक्यातील गौर गावासह संपूर्ण तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक/धार्मिक क्षेत्रात देखील आपल्या कर्तृत्वाची छाप पाडणारे आदर्श व्यक्तीमत्व तथा आदर्श शिक्षक श्री. आबनराव पारवे सर यांनी ते कार्यरत असलेल्या प्रत्येक जिल्हा परिषद शाळांना आपल्या काराकिर्दीतील काळात आदर्श शाळा म्हणून नावलौकिक मिळवून दिला विद्यार्थी प्रिय शिक्षक,विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रगतीसाठी अहोरात्र झटणारे आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते तालुक्यातील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात सतत धडपडणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांनी स्व:कर्तृत्वाने जनसामांन्यांच्या हृदयावर छाप पाडलेली आहे.

पुर्णा तालुक्यातील मौ.फुकटगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असतांना त्यांनी शाळेची केलेली सुधारणा अन् विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी केलेली तळमळ पाहता परभणी परिषद प्रशासनाने त्यांना जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले होते अत्यंत ध्येय वेडे सर्वसामान्यांसह विद्यार्थ्यांच्या मनातील आदर्श प्रेमळ व्यक्तीमत्व म्हणून श्री.अबनरावजी पारवे सर यांच्याकडे बघितले आज त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा अर्थात वाढदिवस असल्यामुळे त्यांना जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स परिवारासह शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन महाराष्ट्र कडून वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा.....  

✍🏻व्यक्ती  आणि  व्यक्तीमत्व - चौधरी दिनेश (रणजीत)

संपादक /संचालक  जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या