🌟पुर्णा तालुक्यातील पिंपळगाव लिखा ग्रामपंचायत उपसरपंचांनी अंतरवली सराटी घटनेच्या निषेधार्थ दिला राजीनामा...!


🌟पिंपळगाव लिखा ग्रामपंचायत सरपंच यांच्याकडे उपसरपंच ज्ञानोबा किरगे यांनी दिला आपल्या पदाचा राजीणामा🌟


पुर्णा (दि.०५ सप्टेंबर २०२३) - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवेली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली यावेळी त्यांना पाठींबा म्हणून गावकऱ्यांसह सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने सुरु केलेले आंदोलन उधळून लावण्याच्या दृष्ट हेतूने आंदोलकांसह माता भगिनी व कार्यकर्त्यांवर शुक्रवार दि.०१ सप्टेंबर २०२३ रोजी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडून जोरदार लाठी हल्ला तसेच गोळीबार केला या घटने अनेक आंदोलकांसह माता भगिनी देखील जखमी झाल्या या घटनेचे तिव्र पडसाद सर्वत्र उमटत असतांनाच आज मंगळवार दि.०५ सप्टेंबर २०२३ रोजी पुर्णा तालुक्यातील पिंपळगाव लिखा येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच ज्ञानोबा नरहरी किरगे यांनी या घटनेचा तिव्र निषेध नोंदवत मराठा आरक्षणाला पाठींबा म्हणून आपल्या उपसरपंच पदाचा राजीणामा पिंपळगाव लिखा ग्रामपंचायतचे सरपंच यांच्याकडे सुपुर्द केला.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या