🌟लोकशाही न्यूज चॅनल वरील ७२ तासांच्या दडपशाहीचा निषेध...!


🌟"पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने लोकशाही न्यूज चॅनल सुरू करण्याची मागणी🌟


🌟"ना जातीसाठी,ना मातीसाठी" लढाई फक्त पत्रकारांच्या न्याय व हक्कासाठी🌟

यवतमाळ :-  लोकशाही न्यूज चॅनलने काही दिवसांपूर्वी  भाजपचे  माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या संदर्भात एक वृत्त प्रसारित केले होते मात्र या बाबत एकतर्फी निर्णय घेत लोकशाही न्यूज चॅनल ७२ तास बंद ठेवण्याचे आदेश केंद्र सरकारने काल रात्री दिले असून हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अपमान आहे,

सदर न्यूज चॅनल त्वरित सुरू करण्यात यावे अशी  मागणी "पत्रकार संरक्षण समिती" च्या वतीने केंद्र सरकारकडे ईमेल व्दारे केली आहे भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओ प्रकरणी तपास सुरु असतानाच माहिती व प्रसारण मंत्रालय दिल्ली ने लोकशाही मराठी न्यूज चॅनलला नोटीस देत ७२ तासांसाठी लोकशाही मराठी न्यूज चॅनेल बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत.

सदर प्रसारमाध्यमांची गळचेपी असून माध्यम स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचे काम सरकार करत असल्याचे दिसत आहे तसेच *मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीने लक्ष देऊन लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला न्याय द्यावा अशी मागणी "पत्रकार संरक्षण समिती" चे संस्थापक / अध्यक्ष विनोद एन.पत्रे यांनी केली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या