🌟आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राचार्य अतुल दुबे व मुख्याध्यापक उमाकांत साखरे यांचा सत्कार....!


🌟नाथ शिक्षण संस्था कार्यालयात सहसचिव प्रदिप खाडे यांनी केला सत्कार🌟


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य अतुल दुबे व शारदाबाई गुरूलिंगअप्पा मेनकुदळे विद्यालयाचे मुख्याध्यापक उमाकांत साखरे यांचा नाथ शिक्षण संस्था कार्यालय येथे सत्कार करण्यात आला. नाथ शिक्षण संस्थ संचलित शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात परळीसह बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे, अशा शब्दांत नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे  यांनी सत्कारमूर्ती यांचे कौतुक करत, त्यांचे अभिनंदन करण्याबरोबरच पुढील वाटचालीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. 

          मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त जाहीर करण्यात आलेला आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हाधिकारी दिपाताई मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य अतुल दुबे व शारदाबाई गुरूलिंगअप्पा मेनकुदळे विद्यालयचे मुख्याध्यापक उमाकांत साखरे यांना प्रदान करण्यात आला.  नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहसचिव प्रदिप खाडे सर यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य अतुल दुबे व मुख्याध्यापक उमाकांत साखरे यांचा आज शुक्रवार दि. 22 सप्टेंबर रोजी नाथ शिक्षण संस्थेच्या कार्यालयात शाल, श्रीफळ, फेटा, पुष्पगुछ देऊन सत्कार करून त्यांचं खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदिप खाडे, गोविंद मुंडे, खाकरे बाप्पा, बापू कोकरे, पत्रकार महादेव गित्ते आदी  उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या