🌟पुर्णा तालुक्यातील लिमला ग्रामपंचायतचा आगामी येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार.....!

 


🌟सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी निवडणुकीवर टाकणार बहिष्कार🌟 

 पुर्णा :- तालुक्यातील लिमला येथे मराठा आरक्षणासह विविध मागण्या संदर्भात दि.२९ पासून साखळी उपोषण करण्याचा मराठा समाजाच्या वतीने निर्धार केला असुन येणाऱ्या सर्व निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला जाणार असल्याचा एक मुखी ठराव ग्रामपंचायत मध्ये घेतला आहे

लिमला येथील  मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासह समाजाच्या विविध संदर्भात बुधवार 27  सप्टेंबर रोजी पूर्णा तहसील चे नायब तहसीलदार तसेच ताडकळस पोलीस स्टेशन ला  मराठा बांधवांनी निवेदन दिले आहे जरांगे पाटलाच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवत सरसकट  कुणबी प्रमाणपत्र द्यावे आरक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा या 

सह अन्य मागण्यांबाबत  लिमला येथील ग्रामस्थांनीआज तहसील गाठले नायब तहसीलदार  मस्के यांना निवेदन देऊन मराठा समाजाच्या विविध मागण्या संदर्भात शासनाला कळवावे अशी विनंती केली तसेच येणाऱ्या 29 सप्टेंबर पासून गावामध्ये साखळी उपोषण करण्याचा ग्रामस्थांनी निर्धार केला आहे जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत  सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचाही ग्रामस्थांनी एकमुखी ठराव घेतला आहे

या निवेदनावर मराठा समाजाचे  कार्यकर्ते लक्ष्मण शिंदे चअरमन दामोदर शिंदे विष्णु शिंदे शिवबाबा शिंदे गोविंद शिंदे नरहरी शिंदे योगेश शिंदे भागवत शिंदे ज्ञानोबा शेजुळ गजानन शिंदे श्रीकांत शिंदे विठ्ठल चाळक शाम शिंदे भारत शिंदे बालाजी ढगे सिताराम गाडे  आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या