🌟एक लोटा जल नव्हे तर महादेव भक्तीसाठी पसाभर पाण्याची गरज - हभप.रामराव महाराज ढोक


🌟केदारेश्वर मंदिरात श्रावणानिमीत्त किर्तन,नाथ शिक्षण संस्थेच्या वतिने आकर्षक रोषणाई व पुष्पसजावट🌟 


 
अंबाजोगाई (प्रतिनिधी) :- सध्या काहीजण एक लोटा जल समस्या का हल असा प्रसार करत आहेत.परंतु वारकरी सांप्रदायात सातशे वर्षापुर्वी संत नामदेवांनी पसाभर पाणी एक बेलाचे पान महादेव भक्तीसाठी पुरेसे असल्याचे प्रतिपादन रामाणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांनी केले.अंबाजोगाई शहरातील जागृत देवस्थान केदारेश्वर येथील कीर्तनात ढोक महाराज बोलत होते.

       सोमवार दि.11 सप्टेंबर रोजी रात्री केदारेश्वर मंदिरात नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहसचिव प्रदिप खाडे यांच्या वतिने ह.भ.प.रामराव ढोक महाराज यांच्या किर्तनाचे आयोजन केले होते.यानिमीत्त केदारेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई व पुष्पसजावट करण्यात आली होती.आवडीनें भावें हरिनाम घेसी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥१ नको खेद करूं कोणत्या गोष्टीचा ।पती लक्षुमीचा जाणतसे ॥२॥ सकळ जिवांचा करितो सांभाळ ।तुज मोकलील ऐसें नाही ॥३॥ जैसी स्थिति आहे तैशापरी राहे।कौतुक तूं पाहे संचिताचें ॥४॥ एका जनार्दनीं भोग प्रारब्धाचा ।हरिकृपें त्याचा नाश आहे ॥५॥ या संत एकनाथ महाराजांच्या अभंगावर विमोचन करताना ढोक महाराज म्हणाले की,सध्या हा देव मोठा तो लहान असा भेदभाव केला जात आहे.साधु- संतांनी असा भेदभाव न करता ज्याला ज्या देवाचे भजन करावयाचे त्याने भजन करावे असे सांगितले आहे.विष प्राशन केलेले असले तरी महादेव रंगाने गोरा व विष्णुने अमृत प्राशन केलेले असले तरी सावळा आहे.विष्णुचा उपवास हा एकादशी तर महादेवाचा उपवास सोमवार आहे.अलिकडील काळात अनेकजण देवाच्या भक्तीबाबत वेगवेगळे मार्ग सांगत आहेत परंतु इश्वर भक्तीचे सर्व मार्ग वारकरी सांप्रदायातील साधु-संतांनी सांगितले असल्याचे ढोक महाराज म्हणाले.


*नियोजन व सजावटीचे कौतुक :-

 ह.भ.प.रामराव ढोक महाराजांनी किर्तनाच्या सुरुवातीस नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राज्याचे कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे व सहसचिव प्रदिप खाडे यांनी केदारेश्वर मंदिरावर केलेली विद्युत रोषणाई व पुष्पसजावटीचे कौतुक करत पवित्र श्रावण महिन्यात किर्तनाचे आयोजन करुन मोठे पुण्य वाटुन घेतले असल्याचे सांगितले.या किर्तनास   यावेळी कीर्तनसास राजकिशोर मोदी, राजेसाहेब देशमुख, लोमटे, विनायक गुट्टे, प्राचार्य अतुल दुबे, महादेव फड आदीसह शेकडो भाविक उपस्थितीत होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या