🌟हिंगोलीत स्थानिक गुन्हे शाखेची धाडसी कामगिरी : स्थागुशाने घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी केली गजाआड....!


🌟या कारवाईत आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळी कडून चार लाखांचा मुद्देमाल जप्त🌟

हिंगोली (दि.१८ सप्टेंबर २०२३) - हिंगोली जिल्ह्यात होणाऱ्या चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालुन सदर गुन्हें करणारे आरोपी व त्यांचे टोळीला पकडण्याकरीता हिंगोली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक श्री.जी.श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस आदेश देऊन वेकोवेकी मार्गदर्शन केले त्यावरून स्थागुशाचे पोलिस निरिक्षक श्री पंडीत कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरिक्षक शिवसांब घेवारे यांचे पथक काम करत होते.


जिल्ह्यातील वसमत शहरामध्ये माहे जूलै आणि ऑगस्ट २०२३ मध्ये एकाच रात्री अनेक दुकानांचे शटर फोडून चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या तसेच अनेक बंद घरे फोड़ुन सुध्दा घरफोडी झाली होती त्या अनुषंगाने स्थागुशच्या तपास पथकाने बारकाईने तपास चक्रे फिवुन अनेक रेकॉर्ड वरिल गुन्हेगारांना तपासले, अनेक संशयीत वस्त्यावर छापेमारी करून गोपनिय माहिती काढली असता बातमीदारा कडन खात्रीशिर माहिती मिळाली की, वसमत शहर येथील चोरी, घरफोडी करणारे आरोपी नामे १) जोगीदरसिंग रनजितसिंग चव्हाण वय २५ वर्ष रा. रेल्वे स्टेशन परिसर वसमत २) सचिन देवेद्र घलोत वय ३० वर्ष रा. सनीर नगर, रेल्वे स्टेशन परिसर वसमत ३) दिपसिंग तिलपितीया रा. शिवनगर, नांदेड हे असुन या तिघांनी मिळून वसमत शहरातील अनेक शटर फोडया, घरफोडया केलेल्या आहेत.अशी माहिती मिळाल्या वरुतन स्थागूशा च्या पोलीस पथकाने अरोपीतांच्या घरी जाउन छापा मारला असता जोगीदरसिंग चव्हान व सचिन घलोत है घरी मिकुन आले त्यांना विश्वासात घेऊन सदर शटर फोडी, घरफोडी बाबत विचारपुस केली असता त्यांनी वसमत शहरातील बंद घरे व शटर फोडल्याचे कबूल करुन ३.५ तोकळे सोन्याचे दागिने व ६२ तोळे चांदीचे दागिने ,रोख रक्कम २,८००/- रूपये, चोरीसाठी वापरलेले ०२ मोटार सायकली, चोरीसाठी वापरलेला रॉड,कात्री,बेॅटरी असा एकुण ४,००,०০০/-(चार लाखांचा) मुददेमाल जप्त केला आरोपी कडुन दोन घरफोडी व एक शटर फोडीचे गुन्हे उघड झाले आहेत.

नमूद आरोपीवर यापूर्वी हिंगोली,नांदेड, परभणी जिल्ह्यात शटर फोड़ी व घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असुन आरोपी हे रेकॉर्ड वरिल गुन्हेगार आहेत.सदरची कार्यथवाही मा.पोलीस अधीक्षक श्री जी श्रीधर, मो. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटिल, स्थानिक गुल्हे शाखेचे पो.नि. श्री. पंडीत करछ्ये यांचवे मार्दर्शनाखाली स.पो. नि. शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार शेख बाबर, विठठल कोळेकर, गणेश लेकुळे, आकाश टापरे,नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या