🌟पुर्णा तालुक्यातील माटेगावात जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी घटनेच्या निषेधार्थ भव्य आक्रोष मोर्चा संपन्न...!


🌟यावेळी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते🌟


*🚩एक मराठा लाख मराठा🚩*

पुर्णा (दि.०८ सप्टेंबर २०२३) - जालना येथील अंतरवाली गावातील संविधानिक व शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षण मिळावे म्हणून उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यावर अमानुष लाठी हल्ला व गोळीबाराच्या निषेधार्थ काल दि.०७ सप्टेंबर २०२३ रोजी पुर्णा तालुक्यातील माटेगाव येथे भव्य आक्रोष मोर्चा आयोजित करण्यात आला होता.


यावेळी माटेगावातील महादेव मंदिर ते छत्रपती संभाजी महाराज चौक असा भव्य आक्रोष मोर्चा काढण्यात आला यावेळी समस्त गावकरी मंडळी व सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने पुर्णा-झिरोफाटा राज्य मार्गावरील माटेगाव फाटा येथे संपूर्ण रस्ता जाम करून रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आहे.यावेळी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.....   टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या