🌟राज्य शासनाने शासकीय कार्यालयात खाजगी एजन्सी द्वारे कर्मचारी पुरवठाचे शासन निर्णय तात्काळ रद्द करावा....!


🌟पुर्णा तालुका काँग्रेस पक्षाने केली तहसिदार यांच्या मार्फत निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी🌟

पुर्णा (दि.१८ सप्टेंबर २०२३) :-शासकीय निमशासकीय कार्यालयातील रिक्त पदे बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीने 138 संवर्गातील अतिकुशल, कुशल, अर्धकुशल, अकुशल, सर्व प्रकारचे मनुष्यबळ पॅनल मधील 9 एजन्सी मार्फत पुरवण्याचा शासन निर्णय दि 06/09/2023 रोजी निर्णय जारी केला आहे  हे शासन निर्णय रद्द करण्याची मागणी  दि.18 सप्टेंबर रोजी  पूर्णा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून करण्यात आले      राज्यातील दोन लाखापेक्षाही जास्त पदे रिक्त आहेत या जागेवर नियुक्तीसाठी राज्यातील लाखो तरुण कायम नोकरी मिळेल या अपेक्षणीय स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत आशा बेरोजगार उमेदवारांची  स्वप्नांची राख रांगोळी या निर्णयामुळे होणार आहे त्यामुळे तरुणांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होत आहे कंत्राटी भरतीमुळे राज्यातील मागासवर्गीय घटना दंत आरक्षणाचा हक्क डावलला जाणार आहे उपरोक्त शासन निर्णयामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक पालकांच्या नवतरुणांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे स्वप्न भंग होणार आहे बाह्य यंत्रणेकडून विविध विभागातील पदभरती करताना तरुणाची शैक्षणिक गुणवत्ते बाजूला सारून राजकीय हस्तक्षेप व दंडेल शाही व विशिष्ट लाच घेऊन मुलांचा अवमूल्य केले जाईल आणि जातीनिर्देश धर्मनिरपेक्ष पदभरती पद भरती होणार नाही यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात असंतोष पाहावयास मिळेल हे महाराष्ट्राच्या व देशाच्या हिताचे नाही या निर्णयामुळे शासनाच्या ध्येय धोरणावर प्रभावित अंमलबजावणी करताना शासन व प्रशासन व कर्मचारी यांच्या कार्यात अनंत अडचणी निर्माण होतील सदरील बाबीचा विचार करून शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी पूर्णा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.

त्यावेळी निखिल धामणगावे जिल्हाध्यक्ष जिल्हा काँग्रेस सोशल मीडिया  हर्षवर्धन गायकवाड मा. नगरसेवक  प्रल्हाद पारवे कार्याध्यक्ष प्रशांत घाटगिळ शहरउपाध्यक्ष पांडुरंग कदम तालुका उपाध्यक्ष कुंदन ठाकूर विद्यार्थी अध्यक्ष  मतीन खुरेशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या