🌟त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आणि पाच मुली सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे🌟
पूर्णा (दि.२२ सप्टेंबर २०२३) - पुर्णा शहरातील सर्वधर्मसमभाव व सामाजिक ऐक्याचं प्रतीक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जायचं असे तबलीक जमातचे जिम्मेदार हाजी सय्यद अब्दुल गणी अब्दुल मुनवर अली यांचे त्यांच्या राहत्या घरी शास्त्रीनगर या ठिकाणी 22 सप्टेंबर 2023 हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे दुःखद निधन झाले.
पूर्णा शहरातील सामाजिक धार्मिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचे कार्य उल्लेखनीय होते.सर्वधर्मसमभाव सामाजिक ऐक्य आपसी भाईचारा या त्यांच्यातील अंगभूत गुणामुळे सर्व जाती धर्मामध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना होती.मजहब नही सिखाता किसी से बैर रखना या पवित्र वचनानुसार ते ज्या ठिकाणी जात त्या ठिकाणी सामाजिक सदभावाचे वातावरण निर्माण करत असत.
दहा वर्षांपूर्वी त्यांनी पवित्र अशी हज यात्रा केली होती. आपला बहुमूल्य वेळ ते मशिदीमध्ये कुराण ग्रंथाचे वाचन करत. मुस्लिम धर्मियांच्या अंत्यविधीच्या वेळी ते प्रकर्षाने उपस्थित राहायचे पार्थिवाला आंघोळ घालण्यापासून तर अंतिम दफन विधी क्षणापर्यंत त्यांची उपस्थिती राहायची.
पूर्णा व पंचक्रोशी मध्ये निधनाची दुःखद बातमी कळल्यानंतर ते शक्य तितक्या लवकर जात.कुटुंबियाच्या सांत वनापासून ते अंतिम संस्कारापर्यंत समर्पित भावनेने सोबत असत.तबलीक जमातचे जिम्मेदार सदस्य या नात्याने त्यांचं कार्य उल्लेखनीय होतं.शांतता कमिटी मध्ये काम करत असताना पूर्ण शहराची कायदा सुव्यवस्था शांतता अबाधित राहण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असत.
त्यांच्या पश्चात दोन मुले आणि पाच मुली आहेत.त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव सय्यद मुदसिर व दुसरे चिरंजीव हाफेज समी साहब हे आहेत.त्यांच्या अकाली दुःखद निधनामुळे पूर्णा शहरावर शोक कळा पसरली आहे या दुःखातून सावरण्याच सामर्थ्य कुटुंबीयांना अल्लाह देवो ही मनोकामना...!
त्यांच्या विचाराला कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली....
0 टिप्पण्या