🌟भारताने आशियायी स्पर्धेत जिंकली 5 सुवर्ण पदके.....!


🌟आशियाई खेळांमध्ये भारतातून एकूण 655 खेळाडू सहभागी झाले आहेत🌟

आशियाई क्रीडा 2023 मध्ये भारतीय संघासाठी रविवारचा दिवस चांगला होता. भारताला एकूण 5 पदके मिळाली आहेत. आशियाई खेळांमध्ये भारतातून एकूण 655 खेळाडू सहभागी झाले आहेत, जे आतापर्यंत देशातील सर्वात मोठे संघ आहे. एकूण 40 स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू आव्हान देतील. 

 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला नेमबाजीत पहिले पदक मिळाले. मेहुली घोष, आशी चौकसे आणि रमिता यांनी महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत भारतासाठी हे पदक जिंकले. त्यानंतर रोइंगमध्येही भारताने रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. भारतीय महिला क्रिकेट संघानेही अंतिम फेरी गाठली आहे. नंतर रमिताने महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकले.

आशियाई स्पर्धा 2023 मध्ये नेमबाजीनं भारताची मेडल टॅलीचं खातं उघडलं. भारताच्या रमिता, मेहुली आणि आशी यांनी मिळून महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक जिंकलं. तिघांनी मिळून 1886 गुण मिळवले. यामध्ये रमितानं 631.9 गुण, मेहुलीनं 630.8 तर आशीनं 623.3 गुण मिळवले.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या