🌟औरंगाबाद विभागाचा विचार करता गेल्या २४ तासातील विभागात पडलेल्या पावसाची सरासरी ही २.७ मिमी राहिली🌟
परभणी (दि.१५ सप्टेंबर २०२३) : जिल्ह्यात मागील २४ तासात सरासरी केवळ १.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक पाऊस पाथरी तालुक्यात (५.७ मि.मी.) झाला असून, त्याखालोखाल सेलू (५.६ मिमी), मानवत (३.८ मिमी) झाला आहे. याशिवाय जिंतूर (१.२ मिमी) आणि परभणी (१.१) तालुक्यात पावसाने हजेरी लावली. तर पालम (०.८), गंगाखेड (०.४), पुर्णा (०.२) आणि सोनपेठ (०.१ मिमी.) तालुक्यात पाऊस झाला. औरंगाबाद विभागाचा विचार करता गेल्या २४ तासातील विभागात पडलेल्या पावसाची सरासरी ही २.७ मिमी राहिली आहे.....
0 टिप्पण्या