🌟परभणी जिल्ह्यात खरीप हंगामासाठी राज्यात 20 लाख मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध...!


🌟त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार खतांची खरेदी करावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले🌟

परभणी (दि.12 सप्टेंबर 2023) : खरीप हंगाम 2023 साठी राज्यातील शेतकर्ऱ्यांना 43.13 लाख मेट्रिक टन खतांच्या पुरवठ्याचे नियोजन मंजूर असून, आतापर्यंत 59.47 लाख मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध  झाला आहे. त्यापैकी 39.41 लाख मे. टन खतांची विक्री झाली आहेत. तर सध्या राज्यात 20.06 लाख मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार खतांची खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.


राज्यात 1 जून ते 11 सप्टेंबर या कालावधीचे सरासरी पर्जन्यमान 890.4 मिलीमीटर असून, या खरीप हंगामात आतापर्यंत प्रत्यक्षात 766.0 मि.मी. (11 सप्टेंबरपर्यंतच्या सरासरीच्या 86 %) एवढा पाऊस पडलेला आहे. खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र 142 लाख हेक्टर असून आतापर्यंत प्रत्यक्षात 141.09 लाख हेक्टर (99%) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. राज्यात पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत राज्यात सोयाबीन पिकाची 50.72 लाख हेक्टर क्षेत्रावर, कापूस पिकाची 42.30 लाख हे., तूर पिकाची 11.15 लाख, मका पिकाची 9.11 लाख तसेच भात पिकाची 15.28 लाख हेक्टरवर पुनर्लागवड झाली आहे.

राज्यामध्ये 25 जुलै ते आतापर्यंत 613 महसूल मंडळांमध्ये 15 ते 21 दिवसांचा तर 453 महसूल मंडळांमध्ये 21 पेक्षा जास्त दिवसाचा खंड पडला आहे. खरीप हंगाम 2023साठी 19.21 लाख क्विंटल बियाणे गरजेच्या तुलनेत प्राथमिक अंदाजानुसार 21.78 लाख क्विंटल बियाणे उपलब्ध होते. त्यानुसार राज्यात 19 लक्ष 72 हजार 182 क्विंटल (102%) बियाणे पुरवठा झाला आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या