🌟परभणी जिल्ह्यात गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या सनांच्या पार्श्वभूमीवर दि.18 सप्टेंबर पासून कलम 36 लागू......!


🌟जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर.यांनी दिली माहिती🌟


परभणी (दि.05 सप्टेंबर 2023) : परभणी जिल्ह्यात गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण-उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यात येतात. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था  राखली जावी, यासाठी मुंबई पोलीस कलम 36 क, ख, ग, ड 1 (डक) (च) हे 18 ते 29 सप्टेंबर 2023 या कालावधीत लागू करण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर.यांनी सांगितले आहे.  

गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या दोन्ही सणानिमित्त जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तसेच राजकीय पक्ष, संघटनाही हे सण साजरे करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. त्यामुळे जिल्ह्यात 18 ते 29 सप्टेंबर 2023 दरम्यान मुंबई पोलीस कायदा कलम 36 अन्वये प्राप्त अधिकारानुसार परंतु 33 अन्वये केलेल्या कोणत्याही नियम किंवा आदेशाचे उल्लंघन होणार नाही, अशा रितीने वरील कालावधीसाठी कलम लागू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.  

हे आदेश लागू असेपर्यंत जाहीरसभा, पदयात्रा कार्यक्रमांसंबंधी ठाणे प्रभारी अधिकारी किंवा त्याच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सर्व लेखी परवानगी घेतल्याशिवाय आयोजन करू नये तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या आदेशाचे पालन करावे. जाहीरसभा, मिरवणुका, पदयात्रा, मोर्चे यामध्ये शांतता व सुव्यवस्थेला बाधा येणार नाही, अशा घोषणा देऊ नयेत, असे ही त्यांनी कळविले आहे. हे आदेश लग्नाच्या वरातीस, प्रेतयात्रा व धार्मिक कार्यक्रमास लागू नाहीत. कोणी वरील आदेशाचे उल्लंघन केल्यास ती व्यक्ती मुंबई पोलीस कायदा कलम 134 प्रमाणे‍ शिक्षेस पात्र राहणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकातून कळविण्यात आले आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या