🌟नांदेड सचखंड गरूव्दारा बोर्ड कायदा कलम 11 चे संशोधन रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन...!


🌟बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व हजुरी साध संगतच्या वतीने दि.11 सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन🌟

नांदेड (दि.08 सप्टेंबर 2023) - नांदेड येथील शीख समाजाची धार्मिक संस्था गुरुव्दारा सचखंड श्री हजुर अबचलनगर साहिब नांदेडचा कायदा 1956 मध्ये महाराष्ट्र शासनाने दि. 18/02/2015 ते दि. 17/04/2015 रोजी कलम 11 मध्ये संशोधन करून संस्थेवर थेट अध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया सुरू केली. प्रत्यक्षात स्थानिक शीख समाजाची तशी मागणी नव्हती किंवा बोर्ड सदस्यांचाही ठराव नव्हता. त्यामुळे शीख समाजात प्रचंड नाराजी आहे व मागील पाच वर्षापासून कलम 11 संशोधन रद्द व्हावे म्हणून आंदोलन सुरू आहे. गुरुव्दाराचे धर्मगुरू (पंचप्यारे साहिबान) दि. 21-01-2019 रोजी धार्मिक कमेटीचा ठराव घेऊन कायदा कलम 11 चे संशोधन त्वरीत रद्द करण्यात यावे यासाठी संत बाबा बलविंदरसिंघजी (कारसेवावाले), सचखंडवासी संत बाबा प्रेमसिंघजी 96 करोडी मातासाहेबवाले यांच्या संयुक्त नेतृत्वात दि. 21-01-2019 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारांच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला होता. शासनाने वारंवार आश्वासन देवूनसुध्दा कलम 11 चे संशोधन रद्द केले नाही. त्यानंतर दि. 15 ऑगस्ट 2019, 23 जोनवारी 2020 व 23 मे 2022 रोजी धरणे आंदोलन, उपोषण बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व हजुरी साध संगतच्या वतीने करण्यात आले.

आतापर्यंत या विषयावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. यासाठी महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार, दि. 11 सप्टेंबर रोजी लोकशाही पध्दतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते तसेच बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सरदार मनबीरसिंघ ग्रंथी यांनी जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे या धरणे आंदोलनानंतरही शीख समाजाची मागणी पूर्ण न झाल्यास येणार्‍या काळामध्ये जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण, आमरण उपोषण शीख समाजाच्या वतीने करण्यात येईल, असा इशाराही सरदार मनबीरसिंघ ग्रंथी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. तसेच या धरणे आंदोलनात सर्व शीख समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहनही ग्रंथी यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या