🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या.....!


🌟भिमाशंकरच्या डोंगराला ३०० मीटर भेगा ; ८० कुटुंबांचा जीव धोक्यात🌟 

 ✍️ मोहन चौकेकर

* राज्यातील मंदिरे जिर्णोद्धारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक

* सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारात होणार १५,१४४ रुपयांची वाढ, वाढला महागाई भत्ता

* भारताच्या खेळाडू बनल्या वर्ल्ड चॅम्पियन! ९२ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात प्रथमच जिंकलं सुवर्ण

* भिमाशंकरच्या डोंगराला ३०० मीटर भेगा ; ८० कुटुंबांचा जीव धोक्यात !

*‘ज्ञानवापी’च्या एएसआय सर्वेक्षणाला सुप्रीम कोर्टाची मंजुरी

* मानहानी खटला प्रकरणी राहुल गांधींना मोठा दिलासा; शिक्षेला सुप्रीम कोर्टाने दिली स्थगिती

* RPF च्या जवानांना ट्रेनमध्ये ऑटोमॅटिक रायफल वापरण्यास बंदी! मुंबईतल्या घटनेमुळं रेल्वेचा निर्णय

* शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद

* राहुल गांधींना खासदारकी परत मिळणार... मानहानीप्रकरणी दोषी असण्याला सुप्रीम कोर्टाने दिली स्थगिती

* सत्यमेव जयते सत्याचा  विजय झाला -- राहुल गांधी ; काहीही होवो, माझं कर्तव्य करत राहणार --राहुल गांधी

* मिरजेत बापानेच काढला मुलाचा काटा, व्यसनाधीनतेला कंटाळून केला निर्घृण खून, शरीराचे दोन तुकडे करत फेकले तलावात

* संभाजी भिडे यांना पोलिसांची नोटिस, आठ दिवसात हजर राहण्याचा आदेश

* समृद्धी महामार्गाला खड्ड्यांचं ग्रहण; 55 हजार कोटी खर्च करुन बांधलेल्या महामार्गावर खड्डेच खड्डे

* शिवप्रतिष्ठानचे  संभाजी भिडे यांच्या निषेधार्थ इस्लामपूरमध्ये विविध संघटनाकडून निषेध मोर्चा

* सांगली महापालिकेच्या महासभेत नगरसेवक योगेंद्र थोरात यांना मारण्यासाठी माजी महापौर पट्टा घेऊन धावले

* बारसू आंदोलकांना बेंगळुरूमधून फंडिंग, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा यांचा गंभीर आरोप

* कला दिग्दर्शक नितीन देसाई पंचत्वात विलीन, एनडी स्टुडिओमध्ये अखेरचा निरोप 

* इस्लामपूर काँग्रेस कार्यालयाच्या मालकी हक्काचा वाद शरद पवारांच्या कोर्टात

* भाईंदरच्या शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्याप्रकरणी चौकशी होणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले चौकशीचे आदेश

* पक्षनेतृत्व आमचे ऐकत नाही आम्हाला विश्वासात घेत नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लढाऊ नेते रविकांत तुपकर यांचा राजु शेट्टी यांच्यावर गंभीर आरोप; रविकांत तुपकरांनी भाजपमध्ये यावं, आशिष देशमुखांनी दिली खुली ऑफर; भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मला कसलीही आॅफर आली नाही परंतु मला सर्वच पक्षातील आॅफर येत आहेत व येतील असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लढाऊ नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे*

* मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ ; विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

* नितीन देसाई मृत्यू प्रकरणाची कसून चौकशी होईल - उपमुख्यमंत्री अजित पवार

* जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी भष्टाचारी सरकार कुचकामी ठरले विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ओढले सरकारवर ताशेरे*

* महापालिका निवडणुका आमच्या मुळू रखडलेल्या नाहीत--  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

* सरकार हे दंगली आणि हिंसाचार रोखण्यासाठी अपयशी आहेत - संजय राऊत

* दुष्काळी भागामध्ये चारा डेपो सुरू करा, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना समीत कदम यांनी निवेदन दिले

* माझ्यावर काल्पनिक आरोप करण्याचा हा जुना धंदा बंद करा --- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लढाऊ नेते रविकांत तुपकर यांचा राजू शेट्टी यांना टोला*

* रानकवी प्रसिद्ध गीतकार  ना धो. महानोर अनंतात विलीन 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या