🌟मारहान करण्यात आलेले दोन जन नांदेड येथील रहिवासी : ॲटोतून प्रवास करीत असतांना पाकीटमार म्हणून मारहाण🌟
परभणी : परभणी जिल्ह्यात कुठल्याही प्रकारची सखोल चौकशी न करता चोर समजून अमानुषपणे मारहाण करण्याच्या घटना घडत असून यापूर्वी मे २०२३ या महिन्यात ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीत उखळद या गावात जमावाकडून तिन अल्पवयीन बालकांना चोर समजून अमानुषपणे मारहाण झाली होती या दुर्दैवी घटनेत एका चौदा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला होता या घटनेला तिन महिन्याचा कालावधी उलटत नाही तोच पुन्हा काल शनिवार दि.१२ आगस्ट २०२३ रोजी दुपारी १२-१५ वाजेच्या सुमारास परभणी-वसमत रस्त्यावर ऑटोतून प्रवास करणार्या दोघा जणांना जमावाने चोर समजून अमानुषपणे जबर मारहाण केल्याची दुर्दैवी घटना घडली.
परभणी जिल्ह्यात तसेच पुर्णा तालुक्यातही ग्रामीण भागात सर्रास चोरीच्या घटना वाढल्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता कमालीची सतर्क झाली आहे अनेक चोरीच्या घटनांच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर देखील या घटनांचा तपास लावल्या जात नसल्यामुळे नागरिक आता कायदाही हाती घेऊ लागल्यामुळे अश्या घटना घडत असल्याचे निदर्शनास येत आहे परभणी-वसमत रस्त्यावर जमावाकडून अमानुषपणे मारहाण झालेले दोघेही नांदेड येथील रहिवासी असून हे दोघे ॲटोतून प्रवास करत असतांना ते पाकीटमार आहेत, असा समज करीत काहींनी त्या दोघांना मारहाण सुरु केली. पाठोपाठ जमावानेही या दोघांना बेदम चोप दिला. त्यात हे दोघेही जबर जखमी झाले. नवा मोंढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून त्या दोघांना ताब्यात घेतले खरे, परंतु हे दोघे खरोखरच पाकीटमार होते हे कळले नाही त्या दोघांचीही नावे व अन्य खूलासा मोंढा पोलिसांनी केला नाही.....
0 टिप्पण्या