🌟अनुराधा इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.....!


🌟याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका जया नन्हई मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले🌟

 ✍️ मोहन चौकेकर 

चिखली. येथील अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पडला . याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका जया नन्हई मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील व्हाईस हेड गर्ल कु.शार्वी कुलकर्णी आणि व्हॉइस हेड बॉय सारीम खान  हे  होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत देशभक्तीपर गीते आणि नृत्य सादर करण्यात आले. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत विविध देशभक्तीपर गीत सादर करण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी या दिनावर भाषणे केली. शाळेतील भालके मॅडम यांनी 'शहीद के बेटे की दीपावली' या कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सैनिका प्रति आदर निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शाळेच्या मुख्याध्यापिका जया नन्हई मॅडम यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व व स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्यसेनानींचे योगदान याविषयी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग दहावीतील अश्विन पाटील आणि गौरी सुरडकर या विद्यार्थ्यांनी केले. आणि सर्वात शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊवाटप करून जाधव सर यांनी आभार प्रदर्शन केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक , कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. व देशभक्तीपर घोषणा दिल्या.  या कार्यक्रमासाठी संस्थेच्या मार्गदर्शक सल्लागार सुजाता कुल्ली मॅडम, शाळा समितीच्या अध्यक्षा वृषाली ताई बोंद्रे यांनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या