🌟पूर्णा तालुक्यातील खडकी पुलावर केले अनोखे आंदोलन🌟
🌟चार दिवसात पर्यायी रस्त्याची उंची वाढविण्याचे बांधकाम विभागाचे लेखी आश्वासन🌟
परभणी - पुर्णा तालुक्यातील कावलगांव ते नांदेड या महामार्गावर खडकी पुलाचे काम मागील अनेक महिन्यापासून सुरु आहे, परंतु या पुलास पर्यायी रस्ता न दिल्याने या रस्त्यावरील दहा ते बारा गावांचा तालुका व जिल्हयांशी संपर्क तुटला आहे. परिसरातील नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून नदी पात्रातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्याशिवाय याच नदीवरील आलेगाव ते पिंपरण या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधण्यात आलेल्या नवीन पुलावरील उच्च दाबाच्या विद्युत तारा न काढताच पुलाचे काम करण्यात आले त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूकही बंद आहे. या बाबत कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी व उप विभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुर्णा यांना वेळोवेळी तक्रारी करुनही काम होत नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज दि. १४ ऑगस्ट २०२३ रोजी पूर्णा तालुक्यातील खडकी पुलावर अकार्यक्षम सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतीकात्मक पिंडदान करून अनोखे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाची धास्ती घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने आंदोलनाच्या आदल्या दिवशी आलेगाव ते पिंपरण या रस्त्यावरील नवीन पुलावरील उच्च दाबाच्या विद्युत तारांची उंची वाढवली परंतु कावलगाव ते नांदेड रस्त्यावरील निर्माणाधीन खडकी पुलाच्या पर्यायी रस्त्याचे काम केले नव्हते त्या मुळेच सदरील आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलन स्थळी चुडावा पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
आंदोलनात सुरुवातीला खडकी पुलावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीचे प्रतीकात्मक पिंडदान आंदोलन करण्यात आले. आंदोलन ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री. जायभाये यांनी येत्या चार दिवसात खडकी पुलाच्या पर्यायी रस्त्याची उंची वाढवून पाईप टाकण्याचे लेखी आश्वासन दिल्या नंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले.
खडकी पुलावर झालेल्या या आंदोलनामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या भल्यामोठ्या रांगा लागल्या होत्या. आंदोलनकर्त्यांना प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, उपजिल्हा प्रमुख नरेश जोगदंड व तालुका प्रमुख शिवहार सोनटक्के व शहर प्रमुख संजय वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. आंदोलनात श्रीहरी इंगोले, दीपक सवराते, चंपक कदम, वामन सोनटक्के, सोपान वाघमारे, सुधीर गोडबोले, होनाजी धवन, पांडुरंग पिसाळ, सदाशिव डाखोरे, विठ्ठल कवशे, शिवाजी वंजे, प्रभू वड, गजानन महाजन यांच्या सह कावलगाव, पिंपरण, आलेगाव, सातेफळ, कलमुला सह सर्कल मधील नगिरकांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला....
0 टिप्पण्या