🌟पुर्णा तालुक्यातील चुडावा ते मुंबई मंत्रालयावर निघालेल्या पदयात्रेला छावाचा पाठींबा...!


🌟परभणी जिल्हा अ.भा.छावा मराठा संघटनेने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पाठवले निवेदन🌟

परभणी(दि.१० आगस्ट २०२३) - परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यातील चुडावा येथून मराठा समाजाला १६% आरक्षणासह शेतकरी हिताच्या मागणीसाठी दि.०१ आगस्ट २०२३ रोजी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रेम देसाई यांनी काढलेल्या चुडावा ते मंत्रालय मुंबई पायी पदयात्रेला आज गुरुवार दि.१० आगस्ट २०२३ रोजी अखिल भारतीय छावा मराठा संघटनेने पाठींबा दर्शवत परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवले. 

परभणी जिल्हा अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी परभणी यांच्या मार्फत पाठवण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की मराठा समाजाला १६% आरक्षण व शेतकच्यांच्या विविध मागण्यासाठी चुडावा ते मंत्रालय मुंबई पायी पदयात्रेला छावा संघटनेचा संपूर्णपणे पार्ठीबा आहे राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला १६% आरक्षणासह शेतकऱ्यांच्या हितासाठी अखिल भारतीय छावा संघटनेने आपणास दिनेल्या निवेदनातील मराठवाड्यातील शेतकऱ्यांना प्रती हेक्टर जमीनीला ०५ लाख रुपये कर्ज द्यावे,शेतकऱ्यांना शेतीसाठी विज मोफत देण्यात यावी, महाराष्ट्रामध्ये खते व बियाणे यांच्यावरील जी.एस.टी/सी.एस.टी. शासनाने तात्काळ बंद करावी,मराठा समाजाला ओबीसी मधून १६% आरक्षण ५०% च्या आतमध्ये ह्यावे.शेतकऱ्यांना एक एक्कर जमीनीला पेरणीला खरीप पिकासाठी १० हजार रुपयें व रब्बी पिकासाठी १० हजार रुपयें अनुदान द्यावे तसेच महाराष्ट्रमध्ये नद्या जोडप्रकल्प राबवून त्या धरणाचे पाणी महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांना शेती पिकासाठी मिळावे आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक खेडयामध्ये शेतशिवारात कॅनॉल नसेल तिथे कॅनॉल बनवण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या असून अखिल भारतीय छावा संघटने दिलेल्या निवेदनावर मराठवाडा कार्याध्यक्ष गोविंदराव मूळे,जिल्हाध्यक्ष छत्रपती शिंदे,छावा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष तथा युवा नेते गजानन सवराते,उपजिल्हाध्यक्ष नागनाथ गुंडाळे,तालुकाध्यक्ष शिवजीत डाखोरे आदींच्या स्वाक्षरी आहेत....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या